Government Schemes

जानेवारी महिन्यात लेट खरीपात कांद्याला दर मिळाला नाही. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यभर आंदोलने केली होती. तसंच अनेक बाजार समितीतील कांदा लिलाव देखील बंद पाडले होते.

Updated on 01 September, 2023 10:11 AM IST

नाशिक 

कांदा अनुदान १५ ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना मिळेल अशी घोषणा अधिवेशान करण्यात आली होती. मात्र अद्यापही हे अनुदान शेतकऱ्यांच्या जमा झाली नाही, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.

मागील वर्षीच्या खरीपात कांदा घरात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ३५० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यावेळीचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी १५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल, अशी माहिती दिली. पण अद्यापही शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले नाही. 

जानेवारी महिन्यात लेट खरीपात कांद्याला दर मिळाला नाही. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यभर आंदोलन केले. त्यानंतर सरकारने अनुदान जाहीर केले आहे. २७ मार्च रोजी शासन निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, कांदा अनुदान अर्जप्रक्रिया ३० एप्रिलपर्यंत सुरू राहिली. अर्ज स्वीकारल्यानंतर त्याची जुलैच्या मध्यापर्यंत विशेष लेखापरीक्षक यांच्याकडून तपासणी झाली. त्यानंतर कांदा अनुदान प्रस्ताव पणन विभागाकडे गेला. मात्र पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत.

English Summary: Did the government's onion subsidy announcement really turn out to be hollow
Published on: 15 August 2023, 11:33 IST