Government Schemes

शिक्षणासाठी वयाची 26 वर्षे उचलण्यासमवेत आपल्याला एखाद्या लहान मोठया व्यवसायाला जवळ केले पाहिजे असा विचार प्रविणला अस्वस्थ करत होता. एका बाजूला शिक्षणात अभ्यासक्रमाची तयारी तर दुसऱ्या बाजूला या अस्वस्थेतून आपल्याला नेमके काय करता येईल त्या उद्योग व्यवसायाच्या निवडीचाही त्याने अभ्यास सुरु ठेवला.

Updated on 17 November, 2023 2:36 PM IST

Government Scheme : सर्वच युवक शासकीय सेवेसाठी अथवा इतर नोकऱ्यासाठी पात्र ठरतीलच असे नाही. आपल्या वयाचा विचार करुन नोकरीसाठी प्रयत्नांसमवेत सेवा क्षेत्रात उपलब्ध असलेल्या स्वयंरोजगाराला गवसणी घालावी असा विचार ठेवणारे युवक हे आता खऱ्या अर्थाने स्वयंरोजगारातले नायक ठरत आहेत. नायगाव सारख्या तालुक्यात अवघे 7 एकर कोरडवाहू क्षेत्र असलेल्या कुटूंबातून प्रविण चव्हाण या युवकाने आपल्या शिक्षणाला सुरु ठेवत पार्टटाईम म्हणून सुरु केलेल्या उद्योगातून महिना 50 हजार रुपयांपर्यत आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केले आहे.

प्रविणने अभ्यासात प्राविण्य मिळवूनही केवळ शिक्षणात वाढत्या वयाला वाहते करण्यापेक्षा स्वयंरोजगाराला अधिक जबाबतदारीवर स्वत:ला आणून ठेवले. नांदेड येथील यशवंत महाविद्यालयातून कॉमर्समध्ये पदव्युत्तर पदवीला त्याने चांगल्या गुणाने गवसणी घातली. शिक्षणातच आपले भविष्य घडवता येईल या उद्देशाने नीट परीक्षेतही त्याने उत्तम यश संपादन केले. यासमवेत सीएच्या अंतिम वर्षापर्यत त्याने आता मजल गाठली आहे. भविष्यात सीए व्हायचे याची खुणगाठ बांधून आपल्या वाढत्या वयाकडे लक्ष देवून प्रविणने अभ्यासाला व्यावसायिक उपक्रमाची एखादी जोड देता येईल का ? याची चाचपणी सुरु ठेवली होती.

शिक्षणासाठी वयाची 26 वर्षे उचलण्यासमवेत आपल्याला एखाद्या लहान मोठया व्यवसायाला जवळ केले पाहिजे असा विचार प्रविणला अस्वस्थ करत होता. एका बाजूला शिक्षणात अभ्यासक्रमाची तयारी तर दुसऱ्या बाजूला या अस्वस्थेतून आपल्याला नेमके काय करता येईल त्या उद्योग व्यवसायाच्या निवडीचाही त्याने अभ्यास सुरु ठेवला. या चाचपणीत नांदेड येथील शिक्षण क्षेत्रात दडलेल्या व्यवसायाने प्रविणला खुणावले. कोणत्याही व्यवसायाला सुरु करण्यापूर्वी आपण हाच व्यवसाय का निवडावा याची उत्तरे शोधली पाहिजेत हे त्याला मनोमन पटल्याने जे करायचे ते अभ्यासूनच याचा त्याने विसर पडू दिला नाही.

व्यवसाय तर निवडला पण यासाठी ना स्वत:ची जागा न स्वत:चे भांडवल. या दोन्ही गोष्टीची चाचपणी त्याने सुरु केली. कर्जासाठी बँकाना ज्या अटीची पूर्तता करावी लागते ते लक्षात घेवून त्याने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्याशी संपर्क साधला. महामंडळातील अधिकाऱ्यांनी तत्परता दर्शवीत त्याला संपूर्ण सहकार्य देवून केले. भागभांडवलासाठी लागणाऱ्या 9 लाख रुपयांची तरतूद अशा रितीने पूर्ण करता आली. जो व्यवसाय निवडला तो होता वातानुकुलित अभ्यासिकेचा !

अभ्यासिकासाठी चांगल्या खुर्च्या, टेबल, आल्हाददायक वातावरण आणि प्रशस्त जागा ही या व्यवसायाची अट त्याने पडताळून घेतली. नांदेड येथील शैक्षणिक हब लक्षात घेवून मी हा व्यवसाय निवडल्याचे त्याने सांगितले. जी कर्जाची रक्कम होती त्याची परतफेड करण्यासाठी किमान 7 वर्षाचा कालावधी आवश्यक आहे हे माझ्या लक्षात आले होते. ते लक्षात घेवूनच मी जागा मालकाशी 7 वर्षाचा भाडेकरार करुनच निर्णय घेतल्याचे गुपित प्रविण चव्हाण याने सांगितले.

कोणत्याही व्यवसायात आव्हाने असतात. तशी आव्हाने मला या व्यवसायातही आली. माझ्याकडे आजच्या घडीला सुमारे 150 विद्यार्थी अभ्यासिकेत येतात. यातील वयोगट हा माझ्यासाठी आव्हानात्मक भाग होता. एका बाजूला अकरावी, बारावीची लहान मुले तर दुसऱ्या बाजूला पदव्युत्तर व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी 30 वय वर्षे पर्यतची मुले यांच्या मानसिकतेचा मोठा भाग होता. त्याच्यांशी दररोज चर्चा करुन नेमके प्रत्येकाला योग्य असे अभ्यासाचे वातावरण व अभ्यासिकेतील शिस्त काटेकोर पाळणे शक्य झाल्याचे प्रवीणने सांगितले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामुळे जे कर्ज मिळाले त्यातून 6 टन क्षमतेचे एसी, टेबल, खुर्च्या व इतर अत्यावश्यक फर्निचर करता आले. महिन्याला जवळपास यातून 1 लाख रुपयांवरती जास्त उलाढाल होत असून यातील मुख्य खर्च हा विद्युत बिल व जागेचे भाडे असल्याचे माझ्या लक्षात आले. सर्व खर्च वजा जाता महिना किमान 50 हजार रुपये हे उत्पन्न सुरु झाल्याबद्दल प्रविण चव्हाण याने सांगितले.

माझ्या समवेतची अनेक मुले अभ्यासातच चाचपडत आहेत. अनेकजण स्पर्धा परीक्षेसाठी वेळ घालवित आहेत. अनेकजणांना क्लासचालक स्पष्ट न सांगता वयाची मर्यादा पूर्ण होईपर्यत त्यांना केवळ आशा दाखवित आहेत. सर्वजण बाजूनी सुरु असलेले शोषण या स्वप्नाच्या नावाखाली होत आहे हे युवकांनी ओळखले पाहिजे. आपल्याला साधे घरातले लाईटचे बटन बदलता येत नाही. घरात फ्रीज असेल त्याचे काही कळत नाही. मोबाईलला काही झाले ते समजत नाही. शेतीतल्या विहीरीतील पंपात काही बिघाड झाला ते कळत नाही. दुचाकी वाहनातले समजत नाही. नेमके आपण कुठे आहोत हे युवकांनी ओळखून अगोदर कामाची लाज बाजूला सारून स्वत: ला कोणत्याही कामाकडे वळविले पाहिजे असा मोलाचा सल्ला प्रविण चव्हाण यांनी दिला. विशेष म्हणजे अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली दाखल झालेली अनेक मुले केवळ पालकांची हौस म्हणून दाखल तर होत नाही ना हे ही एकदा पालकांनी तपासून घेतले पाहिजे असे स्पष्ट करायला त्याने कमी केले नाही.

लेखक - विनोद रापतवार, जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड
(सदर माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन येथे प्रकाशित झाली आहे.)

English Summary: Despite the lack of space and capital the young entrepreneur became a stubborn person Look what he fought Scheme Update
Published on: 17 November 2023, 02:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)