Government Schemes

चांगल्या भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करणे गरजेचे असते. मात्र बऱ्याच लोकांना चांगला परतावा देणाऱ्या अनेक योजनेविषयी माहिती नसते. आज आपण सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनेविषयी माहिती जाणून घेऊया.

Updated on 05 September, 2022 12:47 PM IST

चांगल्या भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करणे गरजेचे असते. मात्र बऱ्याच लोकांना चांगला परतावा (Good return) देणाऱ्या अनेक योजनेविषयी माहिती नसते. आज आपण सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनेविषयी माहिती जाणून घेऊया.

जीवन लक्ष योजना (Life Insurance Corporation) च्या या पॉलिसीमध्ये ग्राहकांना दोन प्रकारचा फायदा मिळतो. हा लाभ बोनसच्या स्वरूपात आहे, ज्यामध्ये पहिला सिंपल रिव्हिजनरी बोनस आणि दुसरा अंतिम अतिरिक्त बोनस आहे. दोन्ही बोनसचे फायदे कालांतराने ग्राहकांना दिले जातात.

या पॉलिसी अंतर्गत, ग्राहकाला प्रत्येक महिन्याला रु. 794 चा प्रीमियम भरून 5.25 लाख रुपयांची मॅच्युरिटी दिली जाते. यासोबतच ग्राहकाला संपूर्ण प्लॅनमध्ये लाईफ कव्हरचा लाभ देखील दिला जातो. ही पॉलिसी 8 वर्षांच्या मुलांसाठीही घेतली जाऊ शकते आणि जास्तीत जास्त 50 वर्षांची व्यक्ती ही योजना खरेदी करू शकते.

आता मोफत रेशन मिळणार की नाही? केंद्र सरकार याबाबत घेणार मोठा निर्णय

LIC जीवन लाभ पॉलिसीमध्ये किमान विमा रक्कम रु 2 लाख आहे आणि कमाल विमा रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. ही एक मर्यादित प्रीमियम पॉलिसी आहे. यामध्ये पॉलिसीच्या मुदतीपेक्षा कमी रक्कम भरावी लागते.

5 वर्षांच्या पॉलिसीसाठी 10 वर्षे, 21 वर्षांच्या पॉलिसीसाठी 15 वर्षे आणि 25 वर्षांच्या पॉलिसीसाठी 16 वर्षे. तुम्ही वयानुसार गुंतवणूक करू शकता.

पोस्ट ऑफिससोबत सुरू करा 'हा' व्यवसाय; छोट्या गुंतवणुकीत मिळणार चांगला नफा

जीवन उमंग योजना

30 वर्षीय उमंगने 2 लाख रुपयांच्या विमा रकमेसाठी जीवन लाभ पॉलिसी (Life Benefit Policy) घेतली आहे. उमंगने पॉलिसीची मुदत म्हणून 25 वर्षे निवडली आहेत, त्यामुळे त्याला 16 वर्षांपर्यंतच प्रीमियम भरावा लागेल.

महत्वाचे म्हणजे उमंगला दर महिन्याला प्रीमियम भरायचा असेल तर त्याला ७९४ रुपये भरावे लागतील. जर तुम्हाला वार्षिक प्रीमियम भरायचा असेल तर त्यांना 9,340 रुपये भरावे लागतील. जेव्हा पॉलिसी 25 वर्षे पूर्ण करेल, तेव्हा ती मॅच्युरिटी 5 लाख रुपयांचा लाभ मिळेल.

महत्वाच्या बातम्या 
रिस्क घ्या, चांगला नफा नक्की होईल; जाणून घ्या राशीभविष्यनुसार बिझनेस
गौरी विसर्जन कसे करावे? जाणून घ्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त
दूध उत्पादनासाठी म्हशींच्या 'या' 4 जातीं ठरत आहेत फायदेशीर

English Summary: Deposit LIC plan 794 per month profit 5 lakhs
Published on: 05 September 2022, 12:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)