Government Schemes

ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज वेळेवर जमा केले आहे. अशा शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे.

Updated on 17 October, 2022 4:29 PM IST

ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज (crop loan) वेळेवर जमा केले आहे. अशा शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे.

नगर जिल्ह्यातील पीककर्जाची परत फेड करणारे २ लाख ३ हजार ७६९ शेतकरी आहेत. पहिल्या टप्प्यात या योजनेच्या ३७ हजार १६४ शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांनी आधार कार्ड प्रमाणीकरण करावे अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

या प्रमाणीकरणासाठी आपले सरकार सेवा केंद्रांकडून (Service Centers) कोणतेही शुल्क शेतकऱ्यांकडून घेतले जाणार नाही, अशी माहिती जिल्हा सहकार उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली. पहिल्या टप्प्यात ३७ हजारांवर शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकाची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 'मागेल त्याला विहीर' योजनेअंतर्गत मिळणार 3 लाख 25 हजार रुपयांचे अनुदान

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत लाभ मिळणारे पारनेर तालुक्यात सर्वाधिक ४६ हजार ९२२ शेतकरी असून, पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या यादीत या तालुक्यातील ८ हजार ७०५ शेतकऱ्यांची नावे आहेत.

या खालोखाल संगमनेर तालुक्यातील २१ हजार ८८३ शेतकरी पात्र आहे. पहिल्या टप्प्यात या तालुक्यातील ४ हजार १९० नावे आहेत. तर अकोले तालुक्यात १३ हजार ८४४ असे जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाचे पात्र शेतकरी (farmers) असून, यापैकी ३ हजार ३७० शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत आली आहेत.

कान साफ करण्यासाठी इअरबड्स वापरताय? तर सावधान, पोहचू शकतो धोखा

पात्र शेतकरी 

कोपरगाव-  ७,४५७ शेतकरी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी १३२५
जामखेड-  ९४७० शेतकरी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी २८८८
नगर-  २८४१० शेतकरी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी ५१९६
कर्जत-  १४३४८ शेतकरी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी ३५४८
पाथर्डी- २६१२८ शेतकरी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी ३८५२
नेवासे- ७०२१ शेतकरी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी ६०६
श्रीगोंदे- ८५६९ शेतकरी. पहिल्या टप्प्यातील लाभार्थी ८२४
राहाता- ६२१२ शेतकरी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी ११९१
राहुरी- ३७५८ शेतकरी, पहिल्या लाभार्थी शेतकरी ४७८
शेवगाव- ७१२० शेतकरी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी ७६१

महत्वाच्या बातम्या 
दूध उत्पादक व कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; वारणा सहकारी दूध संघाकडून मिळणार ५४ कोटी रुपये
पोस्ट ऑफिसमधील FD वर बँकेपेक्षा मिळणार जास्त व्याजदर; जाणून घ्या
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! फळबाग लागवडीसाठी सरकार देतंय 100 टक्के अनुदान

English Summary: Comforting Debt relief 37 thousand farmers first phase
Published on: 17 October 2022, 04:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)