Government Schemes

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना (farmers) आर्थिक लाभ मिळावा, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार पुरेपूर पर्यंत करत असते. एवढेच नव्हे तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देखील आता राज्य सरकार देत आहे.

Updated on 19 October, 2022 3:13 PM IST

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना (farmers) आर्थिक लाभ मिळावा, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार पुरेपूर पर्यंत करत असते. एवढेच नव्हे तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देखील आता राज्य सरकार देत आहे.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान (Incentive Grant) उद्या गुरुवारी (दि. 20 ऑक्टोबर) रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील 62 हजार 442 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्धी करण्यात आली आहे.

सोयाबीन दर अजूनही स्थिर; बाजारभाव वाढणार का? जाणून घ्या आजचे दर

जिल्ह्यात 62 हजार 442 शेतकर्‍यांची (farmers) यादी गुरुवारी प्रसिद्ध झाली होती. कर्जमुक्ती योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकऱ्यांनी प्रोत्साहन अनुदान मिळविण्यासाठी आधार प्रमाणिकरणाची गरज होती. पात्र शेतकर्‍यांपैकी 61 हजार 281 शेतकर्‍यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे.

शेतकऱ्याची कमाल! बिबीएफ तंत्राद्वारे घेतोय लाखों रुपयांमध्ये उत्पन्न; जाणून घ्या पद्धती

मात्र अजून 1 हजार 361 शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही. याशिवाय 455 शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. आधार प्रमाणीकरण न झालेल्या तसेच तक्रारी जिल्हास्तरीय समिती (District Level Committee) निकाली काढणार आहे.

तक्रार निकाली निघाल्याशिवाय प्रोत्साहन अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे 1 हजार 361 शेतकर्‍यांच्या प्रोत्साहन अनुदानाबाबतचा आज बुधवारी निर्णय होणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या 
रब्बी हंगामासाठी नवीन ज्वारीचे वाण विकसित; शेतकऱ्यांना होणार दुहेरी फायदा
एलआयसीची नवीन पॉलिसी लाँच; 15 वर्षांनंतर तब्बल 22 लाखांचा लाइफ कव्हर मिळणार
शेतकऱ्यांनो जनावरांना योग्य आहार देऊन वाढवा रोगप्रतिकारक्षमता; होईल चांगला फायदा

English Summary: Comforting 61 thousand farmers Sangli district incentive subsidy tomorrow
Published on: 19 October 2022, 03:05 IST