Government Schemes

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. हिंगोली जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या ठिकाणातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.

Updated on 12 October, 2022 5:07 PM IST

केंद्र सरकार आणि राज्य सरकार (state government) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. हिंगोली जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या ठिकाणातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या (farmers) मदतीसाठी १५७ कोटी ४ लाख ५२ हजार रुपये निधी मिळाला आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत १ लाख ६१ हजार २०७ शेतकऱ्यांना १५४ कोटी ४४ लाख ४२ हजार ६०० रुपये मदतीचे वाटप करण्यात आले आहेत.

मात्र सततच्या पावसामुळे बाधित परंतु 'एनडीआरएफ'च्या निकषांमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. परंतु त्यासाठी अपेक्षित १३२ कोटी १४ लाख ३६ हजार रुपये निधी वितरणास मान्यता न दिल्यामुळे चार तालुक्यांतील शेतकरी मदतीची वाट पाहत आहेत.

यावर्षी अतिवृष्टी पुरामुळे हिंगोली जिल्ह्यांतील पाच तालुक्यांतील जिरायती, बागायती, फळपिके मिळून एकूण १ लाख १३ हजार ६२० हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांनो मसूर मिश्र शेतीची करा लागवड; 110 दिवसात मिळेल भरघोस उत्पन्न

बाधित शेतकऱ्यांसाठी प्राप्त निधीमध्ये जिरायती क्षेत्रातील बाधित १ लाख २५ हजार ५७५ शेतकऱ्यांना नुकसानीबद्दल प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपयेनुसार १५१ कोटी ९७ लाख ७३ हजार रुपये, बागायती क्षेत्रातील बाधित ८ हजार २२७ शेतकऱ्यांच्या प्रतिहेक्टरी २७ हजार रुपये नुसार ५ कोटी १ लाख ३९ हजार रुपये, बहुवार्षिक फळपिकाच्या नुकसानीबद्दल १६८ शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ३६ हजार रुपयेनुसार ५ लाख ४० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

लम्पी प्रादुर्भाव! जनावरांच्या गोठ्यातील स्वच्छता तसेच धूर फवारणीची जनजागृती आता शिक्षकांवर

तालुकानिहाय अतिवृष्टी मदतवाटप स्थिती (कोटी रुपयांत)

तालुका शेतकरी रक्कम टक्केवारी

हिंगोली ६५६८ शेतकरी, १०.९१ कोटी, ९१.६६ टक्के

कळमनुरी ४६४९८ शेतकरी, ४९.०५ कोटी, १००.०० टक्के

वसमत ६८०८० शेतकरी, ५५.३३ कोटी, ९७.५७ टक्के

औंढा नागनाथ १०४५८ शेतकरी, ६.९० कोटी, ९६.७८ टक्के

सेनगाव २९१०३ शेतकरी, ३२.२३ कोटी, १००.०० टक्के

सततच्या पावसामुळे बाधित अनुदानाच्या प्रतीक्षेतील शेतकरी (निधी कोटी रुपयांत)

हिंगोली २७०९५ शेतकरी, ४९१२६ कोटी, ३६.८४ टक्के
कळमनुरी २५३०६ शेतकरी, २३८१२ कोटी, ३५.०८ टक्के
औंढा नागनाथ २९४५० शेतकरी, ४३२०६ कोटी, ४०.०५ टक्के
सेनगाव १४८२६ शेतकरी, १८२६२ कोटी, २०.१६ टक्के

महत्वाच्या बातम्या 
परतीच्या पावसाचा सुळसुळाट! सोयाबीन, कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान; शेतकरी चिंतेत
शेतकऱ्यांनो रब्बी पिकांसाठी 'या' तीन सेंद्रिय खतांचा वापर करा; मिळणार भरघोस उत्पन्न
शासकीय धान खरेदी विक्रीसाठी 41 ठिकाणी नोंदणी केंद्र; शेतकऱ्यांना होणार फायदा

English Summary: Comforting 132 crore fund for the affected farmers
Published on: 12 October 2022, 05:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)