Government Schemes

कृषी आयुक्तालयाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांमधील काही घटकांना आता एका योजनेखाली आणले गेले आहे. या उपक्रमाला ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना’ असे नाव देण्यात आले आहे.

Updated on 20 October, 2023 11:43 AM IST

Mumbai News : कृषी विभागामार्फत मागेल त्याला फळबाग, ठिबक-तुषार सिंचन, शेततळे शेततळेच्या अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणी यंत्रे (BBF) आणि कॉटन श्रेडर देणे योजनेस ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना’ असे नाव देण्यात येत आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

२०२३-२४ आर्थिक वर्षात मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येऊन मागेल त्याला फळबाग, ठिबक/ तुषार सिंचन, शेततळे शेततळेच्या अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणी यंत्रे (BBF) आणि कॉटन श्रेडर देण्याबाबत मागेल त्याला शेततळे या योजनेच्या विस्तारित योजनेस मान्यता देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षपूर्ती निमित्त योजनेस नाव देण्यात आले आहे.

कृषी आयुक्तालयाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांना आता एका योजनेखाली आणण्यात आले आहे. या उपक्रमाला ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना’ असे नाव देण्यात आले आहे. त्याबाबत उपसचिव संतोष कराड यांनी शासन निर्णय देखील जारी केला आहे. शेतकऱ्यांनी मागणी करताच या घटकाचा लाभ त्वरित दिला जावा, असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

English Summary: Chhatrapati Shivaji Maharaj name to Shetale Yojana Know which schemes will get the benefit agriculture scheme
Published on: 20 October 2023, 11:43 IST