Government Schemes

शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्य लोकांसाठी केंद्र, राज्यसरकार नवनवीन योजना राबवत असते, ज्यातून या लोकांना आर्थिक लाभ होईल. यामधील एक योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजना.

Updated on 29 July, 2022 10:20 AM IST

शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्य लोकांसाठी केंद्र, राज्यसरकार नवनवीन योजना राबवत असते, ज्यातून या लोकांना आर्थिक लाभ होईल. यामधील एक योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजना (Ayushman Bharat Yojana).

आयुष्यमान भारत योजनेचा उद्देश सर्वसामान्य जनता आणि गरजू लोकांना मोफत आरोग्य सुविधा (Free health facilities) उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत जे लोक पात्र असतील अशा लोकांचे आयुष्यमान कार्ड बनविले जाते.

या कार्डचा सर्वात मोठा आर्थिक लाभ म्हणजे या योजनेअंतर्गत तब्बल 5 लाख रुपयांपर्यन्त आर्थिक लाभ (Financial benefits) लाभार्थी घेऊ शकतो. विशेष म्हणजे तुम्हाला घरबसल्या आयुष्यमान भारत योजना कार्ड डाउनलोड करता येते.

हे ही वाचा 
Fertilizers: आता भेसळयुक्त खते एका मिनिटातच समजणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

घर बसल्या आयुष्यमान कार्ड डाउनलोड कसे कराल? याविषयी सविस्तर जाणून घेऊया...

तुम्ही आयुष्मान योजनेत अर्ज केला असेल आणि तुम्हाला तुमचे कार्ड हवे असल्यास तुम्ही ते घरबसल्या डाउनलोड करू शकता

सर्वात पहिल्यांदा तुम्ही त्याच्या अधिकृत लिंक https://pmjay.gov.in/ वर जावा.

त्यानंतर लॉगिन करा,यासाठी तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल.

यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.

तिथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका.

हे ही वाचा 
Monkeypox: मंकीपॉक्सचा कहर जगासाठी धोकादायक; 'ही' लक्षणे आढळल्यास त्वरित करा उपाय

यानंतर तुम्हाला तुमच्या अंगठ्याचे ठसे पडताळावे लागतील आणि त्यानंतर 'स्वीकृत लाभार्थी' या पर्यायावर क्लिक करा.

पुढे तुम्हाला मंजूर गोल्डन कार्ड्सची यादी दिसेल. येथे तुम्हाला तुमचे नाव शोधावे लागेल आणि 'Confirm Print' या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला CSC Wallet दिसेल, जिथे तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकावा लागेल.

पुढे पिन टाका आणि होम पेजवर या आणि त्यानंतर तुम्हाला उमेदवाराच्या नावावर कार्ड डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल. तुम्ही तुमचे आयुष्मान कार्ड येथून डाउनलोड करू शकता.

महत्वाच्या बातम्या 
Post Office: पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; लागू झाला 'हा' नवीन नियम
Business: फक्त 10 हजार रुपयात सुरू करा 'हा' व्यवसाय, वर्षभर होईल कमाई
Fish Rice Farming: मत्स्य भातशेतीतून शेतकरी कमवतोय दुप्पट पैसा; जाणून घ्या 'या' शेतीबद्दल

English Summary: Central Govt Scheme card home government providing free treatment
Published on: 29 July 2022, 10:20 IST