Government Schemes

Government Scheme :- समाजातील अनेक घटकांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येत असून या योजनांच्या माध्यमातून अशा घटकांची आर्थिक उन्नती व्हावी आणि त्यांना व्यवसाय उभारता यावा या प्रकारचा सरकारचा उद्देश आहे. याच पार्श्वभूमीवर काल 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना विश्वकर्मा योजना जाहीर केली व या योजनेला आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

Updated on 16 August, 2023 8:54 PM IST

Government Scheme :- समाजातील अनेक घटकांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येत असून या योजनांच्या माध्यमातून अशा घटकांची आर्थिक उन्नती व्हावी आणि त्यांना व्यवसाय उभारता यावा या प्रकारचा सरकारचा उद्देश आहे. याच पार्श्वभूमीवर काल 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना विश्वकर्मा योजना जाहीर केली व या योजनेला आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

कसे आहे विश्वकर्मा योजनेचे स्वरूप?

 ही योजना विशिष्ट शैलीतील कुशल कामगारांसाठी असून या योजनेचे पूर्ण नाव पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना किंवा पीएम विकास योजना असे ठेवण्यात आलेले आहे. महत्वाचे म्हणजे विश्वकर्मा योजनेमध्ये तेरा ते पंधरा हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक होणार असून या योजनेअंतर्गत कमाल 5% व्याजासह एक लाख रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे

अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा पूजेच्या निमित्ताने विश्वकर्मा योजना सुरू करण्यात येणार असून हाच दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देखील आहे.

या योजनेच्या माध्यमातून आता कौशल्य प्रशिक्षण तसेच तंत्रज्ञान आणि आर्थिक सहाय्य देऊन  देशातील जे काही कारागीर आहेत त्यांची क्षमता वाढवण्याकरिता या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून कुशल कारागिरांना एमएसएमईशी जोडले जाणारा असून त्यांना या माध्यमातून चांगली बाजारपेठ मिळणे शक्य होणार आहे.

 कुणाला मिळेल या योजनेचा लाभ?

 या योजनेचा लाभ प्रामुख्याने सोनार, सुतार तसेच शिल्पकार आणि कुंभार या क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींना होणार असून या योजनेच्या माध्यमातून या कारागिरांच्या उत्पादनांचा आणि सेवांचा दर्जा वाढवणे तसेच त्यांना देशांतर्गत बाजारपेठ व जागतिक बाजारपेठेचे जोडण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

तसेच यासोबत लोहार, कुलूप बनवणारे तसेच सोनार, गवंडी, बोट बनवणारे कारागिरी यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.

 या योजनेअंतर्गत कसा मिळेल लाभ?

 पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आता कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र, ओळखपत्र तसेच क्रेडिट सपोर्ट म्हणून एक लाख रुपये पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपये पाच टक्के सवलतीच्या व्याजदरामध्ये दिले जाणार आहे व याला मान्यता देखील देण्यात आली आहे.

English Summary: central government today give approvel to pm vishvakarma yojna
Published on: 16 August 2023, 08:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)