Government Schemes

सिलिंडरचे दर ११०० रुपयांवरून आता ९०० रुपयांवर आले आहेत. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना हा सिलिंडर ७०० रुपयांना मिळत होता. आता ९०० रुपयांच्या सिलिंडरवर ३० रुपयांचं अनुदान मिळाल्यानंतर सिलिंदरचे दर ६०० रुपयांवर पोहोचले आहेत.

Updated on 04 October, 2023 4:32 PM IST

Central Government News : केंद्र सरकारच्या झालेल्या कॅबिनेट बैठकीत सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम २०० रुपयांवरून ३०० रुपये केली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.४) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. आजपासून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान २०० रुपयांवरून ३०० रुपये करण्यात आले आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांनी कपात करण्यात आली.

पुढे ठाकूर म्हणाले की, सिलिंडरचे दर ११०० रुपयांवरून आता ९०० रुपयांवर आले आहेत. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना हा सिलिंडर ७०० रुपयांना मिळत होता. आता ९०० रुपयांच्या सिलिंडरवर ३० रुपयांचं अनुदान मिळाल्यानंतर सिलिंदरचे दर ६०० रुपयांवर पोहोचले आहेत.

उज्ज्वला लाभार्थ्यांना सध्या १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी ७०३ रुपये मोजावे लागतात. तर बाजारभाव ९०३ रुपये आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर आता त्यांना फक्त ६०३ रुपये मोजावे लागणार आहेत.

भारत सरकारने राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना अधिसूचित केली आहे. या मंडळामुळे हळदीबाबत जागरूकता आणि खप वाढण्यास आणि निर्यात वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन बाजारपेठ विकसित करण्यास सुरुवात केली आहे. तसंच केंद्रीय मंत्रिमंडळाने तेलंगणामध्ये सम्माक्का सारक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी केंद्रीय विद्यापीठ कायदा २००९ मध्ये सुधारणा करण्यासही मान्यता दिली आहे.

English Summary: Central Government big decision LPG Cylinder Price update
Published on: 04 October 2023, 04:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)