Government Schemes

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वर्ग करण्यात येतात. परंतु काही दिवसांपासून या योजनेतील होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने नियमांमध्ये बरेच बदल केलेत. त्यातीलच एक महत्त्वाचा नियम म्हणजे शेतकऱ्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Updated on 14 August, 2022 8:01 PM IST

नक्की वाचा:Pm Kisan Yojana: शेतकरी मित्रांनो 'या' गोष्टी त्वरित करा; अन्यथा पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत

  केवायसीच्या बाबतीत केंद्र सरकारचा निर्णय

 पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांचे अजून देखिल ई केवायसी करणे बाकी असून अशा शेतकऱ्यांना केंद्रीय कृषी मंत्रालयाने अजून एक संधी दिली असून 31 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्याचे ई केवायसी करता येणार आहे. यासंदर्भात कृषी मंत्रालयाने पीएम किसान च्या संकेतस्थळावर अधिकृत घोषणा केली आहे.

नक्की वाचा:Horticulture Scheme:आता फळबाग लागवडीला मिळेल चालना, 'या' योजनेच्या अनुदानात सरकारने केली वाढ

 दोन प्रकारे करता येते केवायसी

1- ओटीपीच्या माध्यमातून- पी एम किसान सन्मान निधी योजना नोंदणी केलेले शेतकरी मोबाईल ओटीपी द्वारे देखील केवायसी करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना पी एम किसान च्या वेबसाईटवर जाऊन केवायसी साठी अर्ज करावा लागेल.

या प्रक्रियेच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल व हा ओटीपी शेतकऱ्यांनी सबमिट केल्यावर ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाते.

शेतकरी बंधू स्वतःच्या मोबाईलवरून देखील पीएम किसान योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन ई केवायसी करू शकतात.

2- बायोमेट्रिक पद्धत- यामध्ये दुसरी पद्धत म्हणजे शेतकऱ्यांना आधार कार्ड, बँकेचा खाते क्रमांक व अन्य संबंधित कागदपत्रांची जवळच्या संगणक केंद्रात जाऊन या ठिकाणी आधार कार्डच्या बायोमेट्रिक प्रणालीच्या आधारे ई केवायसी करता येते.

नक्की वाचा:सेंद्रिय शेती करायची आहे ना? तर नका घेऊ टेंशन,'या' योजनेची होईल तुम्हाला मदत

English Summary: central goverment extend limit of e kyc for pm kisaan scheme till 31 august
Published on: 14 August 2022, 08:01 IST