एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी जेव्हा आपण बँकेकडे कर्ज मिळविण्यासाठी अर्ज करतो तेव्हा बँकेच्या फेऱ्या मारूनच कर्ज घेणे नकोसे वाटायला लागते. परंतु आता बँकेकडून कर्ज घेण्यासाठीची जी काही कटकट असते त्यातून मुक्तता मिळण्याची चिन्ह दिसत असून आता बँकेकडून कर्ज बनवणे अगदी सोपे होऊ शकते.
या सगळ्या योजनेवर मोदी सरकार सध्या जोरात काम करीत असून सरकार लवकरच किसान क्रेडिट कार्डाच्या धर्तीवर व्यवसाय क्रेडिट कार्ड जारी करण्याची तयारी करत आहे.
व्यवसाय कार्डच्या माध्यमातून छोट्या व्यावसायिकांना विनातारण स्वस्त दरात कर्ज मिळणे शक्य होणार असून योजना लवकरच संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर सुरू करू शकते.
यासंबंधीची जबाबदारी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया तिच्या नोडल एजन्सीची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता असून याप्रकरणी संबंधित समितीने अर्थमंत्रालयासह अनेक बँकांशी याबाबत चर्चा केली आहे. या व्यवसाय कार्डची क्रेडिट मर्यादा ही 50 हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.
याचा अर्थ असा होतो की लहान लहान व्यावसायिकांना कमी व्याजदरात एक लाखांपर्यंत कर्ज त्यांच्या व्यवसायासाठी सहज मिळू शकणार आहे.
नक्की वाचा:Banana Processing: कच्च्या केळीपासून तयार करा 'हा' पदार्थ,शेतकऱ्यांना मिळेल दुप्पट नफा
हे व्यवसाय क्रेडिट कार्ड कोणाला मिळेल?
याबाबत समितीने शिफारस केली आहे की, एमएसएमइ मंत्रालयाच्या पोर्टलवर ज्या उद्योजकांनी नोंदणी केलेली आहे अशांना व्यवसाय क्रेडिट कार्ड देण्याची शिफारस केली आहे. हे कार्ड सुरू केल्यानंतर संबंधित उद्योजक एंटरप्राइज पोर्टलशी देखील जोडले जाणार आहेत.
हे कार्ड जारी केल्यामुळे किराणा दुकानदार आणि अगदी सलून चालवणार्यांना देखील आर्थिक मदत मिळणे शक्य होणार आहे.
कोरोना कालावधीमुळे लहान मोठ्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. म्हणून आता छोट्या उद्योगांना मदत करण्यासाठी सरकार व्यवसाय क्रेडिट कार्ड सुरू करणार आहे. संसदेच्या स्थायी समितीने या बाबतची शिफारस केली असून या प्रस्तावाला लवकरच ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा:Scheme: 'या' शेतकऱ्यांना मिळते विहीरीसाठी अनुदान,वाचा योजनेबद्दल महत्वाची माहिती
Published on: 01 August 2022, 12:44 IST