देशातील गरीब वर्गाच्या विकासासाठी केंद्र सरकार निरंतर पावले उचलत असून गरिबांच्या हितासाठी सरकारने अनेक योजना राबवत आहे. भारत विकसनशील देश असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर बांधकामे केले जातात, जसं की मोठ्या इमारती, रेल्वे आणि मेट्रो चे बांधकाम तसेच रस्ते व इतर पायाभूत सुविधा इत्यादींचे काम सतत चालू असते. दुसरीकडे असंघटित कामगार जसे की ऑटो ड्रायव्हर, पशुपालक, डिलिव्हरी बॉय इत्यादी.
हे सर्व क्षेत्रात काम करणारे कामगार देखील अधिक जोखीम पत्करतात. हे लक्षात घेऊन सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार वर्गाला आर्थिक सुरक्षा देण्यासाठी 2020मध्ये ई श्रम कार्ड योजना सुरु केली आहे.
नक्की वाचा:शेतकऱ्यांना सुवर्णसंधी! ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी मिळणार 70,000 अनुदान, असे मिळवा अनुदान...
या योजनेसाठी कसा करायचा अर्ज?
देशातील 28 कोटी पेक्षा अधिक कामगारांनी ई श्रम पोर्टल वर नाव नोंदणी केली आहे. तुम्ही असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या श्रेणीत येत असाल तर लवकरात लवकर नाव नोंदणी करणे गरजेचे आहे.
या योजनेसाठी 16 ते 59 दरम्यान वय असलेला कोणताही भारतीय नागरिक अर्ज करू शकतो. जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही या योजनेची अधिकृत वेबसाईट eshram.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
नक्की वाचा:Scheme:महावितरणची 'ही' योजना आहे खूप फायदेशीर,वीज बिलामध्ये करता येते मोठी बचत
या योजनेसाठी कोण नोंदणी करू शकतो?
असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार म्हणजेच दुकानातील कामगार, ऑटो ड्रायव्हर, ड्रायव्हर, पंचर दुकानदार, मेंढपाळ, दुग्ध व्यवसाय करणारे, सर्व पशुपालक, डिलिव्हरी बॉय, वीटभट्टी कामगार इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.
या पोर्टलचे फायदे
ई श्रम पोर्टल वर नाव नोंदणी करणाऱ्यांना दोन लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण दिले जाते. कोणत्याही कारणाने अपघातात मजुराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये अपघात विमा संरक्षण दिले जाते. तसेच अपघातामध्ये अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांची मदत दिली जाते.
Published on: 14 August 2022, 08:39 IST