पीएम किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आला आहे. आता देशभरातील 10 कोटींहून अधिक शेतकरी पीएम किसानच्या 13व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. डिसेंबर ते मार्च या कालावधीत हप्त्याची ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येणे आवश्यक आहे. मात्र याआधीच पंजाब सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
पंजाब सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) मंजूर केली आहे. इतर राज्यांप्रमाणे पंजाबमधील शेतकरीही पीक निकामी झाल्यास प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात.
गावात हे तीन व्यवसाय जबरदस्त चालतात; सुरु करा व्यवसाय आणि मिळवा लाखों रुपये
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यापूर्वी पंजाबमध्ये पिकांचे नुकसान पाच टक्क्यांपेक्षा जास्त नव्हते. मात्र गेल्या दोन वर्षांत कापूस आणि धान पिकाच्या नुकसानीत वाढ होऊन ते १५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
7th Pay Commission: ठरलं तर! जानेवारीमध्ये महागाई भत्त्यात इतकी होणार वाढ
अशा परिस्थितीत पंजाब सरकारला प्रधानमंत्री फसल विमा योजनेला मंजुरी द्यावी लागली. कृषी विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांत पांढऱ्या माशीच्या हल्ल्यामुळे कापूस लागवडीचे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने 700 कोटी रुपये खर्च केले.
Published on: 15 November 2022, 05:00 IST