Government Schemes

शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना चालू केली आहे. आता या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर एक मोठा बदल दिसत आहे. य यामध्ये ई-केवायसीच्या तारखेबाबत वेबसाइटवर दिलेले अपडेट काढून टाकण्यात आले आहे. या बदलानंतर या योजनेच्या 12व्या हप्त्याबाबत विविध अंदाज बांधले जात आहेत.

Updated on 11 September, 2022 3:31 PM IST

शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना चालू केली आहे. आता या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर एक मोठा बदल दिसत आहे.

यामध्ये ई-केवायसीच्या तारखेबाबत वेबसाइटवर दिलेले अपडेट काढून टाकण्यात आले आहे. या बदलानंतर या योजनेच्या 12व्या हप्त्याबाबत विविध अंदाज बांधले जात आहेत.

देशातील बरेच लोक शेतीवर अवलंबून आहेत. या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी सरकारही आपल्या स्तरावर अनेक प्रयत्न करत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी ही देखील अशीच योजना आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. दर चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यावर 2-2 हजार रुपये भरून ही रक्कम पाठवली जाते.

सोने तब्बल 5323 रुपयांनी स्वस्त; आता 10 ग्रॅम सोने मिळणार फक्त 29706 रुपयांमध्ये

आतापर्यंत या योजनेचे 11 हप्ते 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. आता शेतकरी बाराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याच्या कोणत्याही तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांची रक्कम जमा होऊ शकते.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पैसे

सध्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर एक मोठा बदल करण्यात आला आहे. ई-केवायसीच्या तारखेबाबत वेबसाइटवर दिलेले अपडेट पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहे.

आता भविष्यात शेतकऱ्यांना ई-केवायसी करता येईल का, असा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित होत आहे. त्याचबरोबर 12वा हप्ता लवकर जमा होईल असा देखील अंदाज लावला जातोय.

महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी 'हे' खत ठरतंय वरदान; मिळतोय भरपूर नफा
पशुपालकांसाठी दिलासा देणारी बातमी; सरकार 2 लाख रुपयांपर्यंत करणार मदत
एलआयसीच्या 'या' योजनेत फक्त एकदाच पैसे जमा करा; आयुष्यभर खात्यात 50,000 रुपये येतील

English Summary: big change made PM Kisan Yojana website
Published on: 11 September 2022, 03:16 IST