केंद्र सरकार (central govrnment) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतं, ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. यामधील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना. या योजनेबाबद कृषी विभागाने (Agriculture Department) शेतकऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जाहीर केली आहे. कृषी विभागाने या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी सुरू करण्यास सुरुवात केली आहे.
नगर जिल्ह्यात आतापर्यंत 58 हजार 979 शेतकऱ्यांनी (Farmer) या योजनेत सहभाग घेतला आहे. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही. योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलैपयर्यंत मुदत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने (Agriculture Department) केले आहे.
हे ही वाचा
Animal Husbandry: सावधान! जनावरांमध्ये वेगाने पसरतोय लम्पी स्किन डिसीज, अशी घ्या काळजी
विशेष म्हणजे सरकारने खरीप (Kharif) व रब्बी (Rabbi) या दोन्ही हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pradhan Mantri Pik Vima Yojana) जाहीर करून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची नावनोंदणी सुरू आहे. नगर जिल्ह्यासाठी एचडीएफसी एर्गो (HDFC Ergo) कंपनी नियुक्त करण्यात आली आहे.
हे ही वाचा
President Draupadi Murmu: कांद्याच्या दरासाठी थेट राष्ट्रपतींकडे साकडे, देणार 1 टन कांदा भेट
सीएससी केंद्रांद्वारे ऑनलाइन (Online) पद्धतीने नोंदणी केली जात आहे. या योजनेबाबत शेतकऱ्यांना काही अडचणी असतील, त्यांच्या काही तक्रारी असतील किंवा त्यांना आधिक माहिती पाहिजे असेल तर यासाठी कंपनीने प्रत्येक तालुक्यात प्रतिनिधी नियुक्त केले आहेत.
मागच्या वर्षात नैसर्गिक आपत्तींमुळे (Natural Calamities) नुकसान झालेल्या जवळपास 45 हजार शेतकऱ्यांना 26 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. पीक काढणीस येण्याच्या साधारण पंधरा दिवस अगोदर पीक नुकसानीच्या घटना घडतात. अशा वेळी पीक विमा (Pik Vima) घेतला असेल तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान काही प्रमाणात कमी होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
LPG Subsidy: एलपीजी सबसिडीबाबत सरकारची जबरदस्त योजना; जाणून घ्या कोणाला मिळणार सबसिडी
Cotton Production: कापूस संशोधन संस्थेचा मोठा निर्णय; आता कापसाच्या उत्पादनात होणार वाढ
Heavy Rain: सावधान! 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; पुढील काही दिवस धोक्याचे
Published on: 27 July 2022, 11:59 IST