Government Schemes

सर्वसामान्य लोकांसाठी ही महत्वाची बातमी आहे. भविष्यासाठी तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आता गुंतवणूक सुरू करणे सोयीचे ठरेल. अशा काही सुरक्षित योजनेविषयी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे.

Updated on 23 August, 2022 2:06 PM IST

सर्वसामान्य लोकांसाठी ही महत्वाची बातमी आहे. भविष्यासाठी तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आता गुंतवणूक सुरू करणे सोयीचे ठरेल. अशा काही सुरक्षित योजनेविषयी (scheme) तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे.

केंद्र सरकार पुन्हा स्वस्तात सोने (Gold) खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. 2022-23 मध्ये बाँडची दुसरी सीरिज 22 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या योजनेत तुम्ही 26 ऑगस्टपर्यंत गुंतवणूक करू शकता.

ग्राहक 5,197 रुपये प्रति ग्रॅमच्या दराने खरेदी करू शकतात. जर तुम्ही ऑनलाईन बाँड खरेदी केले तर तुम्हाला 50 रुपये प्रति ग्रॅमची सूट देखील मिळेल.म्हणजे तुम्ही फक्त 5147 रुपयांना गोल्ड बाँड खरेदी करू शकता.

Weed Control: असे करा मका, सोयाबीन, कापूस, ज्वारी, पिकांमधील तणाचे नियंत्रण

गोल्ड बाँड योजना

गोल्ड बाँड योजनेच्या दुसऱ्या सीरिजमध्ये तुम्ही 5,197 रुपये प्रति ग्रॅम या दराने सोने खरेदी करू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या बंद किंमतीच्या सरासरी मूल्यावर ही किंमत ठरवण्यात आली आहे.

गेल्या वेळी गोल्ड बाँडची किंमत 5,091 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली होती. यावेळी बॉण्ड्स 5,197 रुपये प्रति ग्रॅम दराने खरेदी करता येतील. म्हणजेच या वेळी रोख्यांची किंमत पूर्वीपेक्षा 106 रुपये अधिक आहे.

या योजनेत तुम्ही ऑनलाइन गोल्ड बाँड खरेदी (gold bond scheme) केल्यास तुम्हाला प्रति ग्रॅम 50 रुपये सूटही मिळेल.अशा प्रकारे, तुम्ही फक्त 5,147 रुपये प्रति ग्रॅम दराने सोने खरेदी करू शकता. या बाँडची मुदत 8 वर्षे आहे. पण तुमची इच्छा असल्यास, तुम्ही 5 वर्षांनंतर कधीही या योजनेतून बाहेर पडू शकता.

Soybean Market Price: सोयाबीन बाजारभावात मोठा बदल; जाणून घ्या सोयाबीचे दर

टेन्शन फ्री व्याज मिळत राहील

या सार्वभौम सुवर्ण रोख्याचे वैशिष्ट्य म्हणजे वार्षिक दराने 2.50 टक्के व्याज देखील उपलब्ध आहे. हे व्याज दर 6 महिन्यांनी तुमच्या खात्यात जमा केले जाते. या व्याजावर तुम्हाला कर भरावा लागेल.

महत्वाच्या बातम्या  
Agriculture Without Soil: मातीविना शेती करता येणार 'या' तंत्राने; शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार
काय सांगता! आता हवेतही घेता येणार बटाट्याचे उत्पादन; एरोपोनिक तंत्रज्ञानाची कमाल\
Green Manure: पिकांना युरिया खताची गरज भासणार नाही; आता घरीच शेतात बनवा हिरवळीचे खत

English Summary: benefits investing government's gold bond scheme
Published on: 23 August 2022, 01:17 IST