भारतात फार पूर्वी पासून शेती समवेतच शेतीपूरक व्यवसाय केला जात आहे. यामध्ये मधमाशीपालन हा व्यवसाय (Beekeeping Business) देखील एक प्रमुख व्यवसाय आहे. मधाचा वापर औषधापासून ते खाण्यापिण्यापर्यंत सर्व्या ठिकाणी केला जातो. बाजारात त्याचे दरही चांगले आहेत.
परदेशातही त्याची मागणी खूप आहे. त्यामुळेच मोठ्या संख्येने शेतकरी पारंपरिक शेती सोडून मधमाशीपालनाकडे वळू लागले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मधमाशी पालन या व्यवसायासाठी मायबाप सरकारही शेतकऱ्यांना मदत करीत आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, मधमाशीपालन विकास नावाची योजना कृषी आणि कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत चालवली जात आहे. मधमाशी पालनाचे क्षेत्र विकसित करणे, उत्पादकता वाढवणे, प्रशिक्षण घेणे आणि जनजागृती करणे हा या योजनेचा उद्देश आहे. मध आणि मेणाच्या व्यतिरिक्त, मधमाशी पालनामुळे मेण, रॉयल जेली, प्रोपोलिस किंवा बी गम, बी परागकण यांसारखे पदार्थ बनवण्यात मदत होते. या सर्व उत्पादनांना बाजारात मोठी मागणी आहे.
हेही वाचा:-मोठी बातमी! सोने तारण ठेऊन SBI देणार शेतकऱ्यांना 'एवढे' लोन
अधिकाधिक शेतकरी बांधवानी मधमाशीपालनाच्या व्यवसायाकडे वळावे, यासाठी राष्ट्रीय मधमाशी मंडळ (NBB) आणि नाबार्डने भारतात मधमाशीपालनासाठी आर्थिक मदत सुरु केली आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय मधमाशी मंडळाकडून 90% पर्यंत अनुदान दिले जाते. निश्चितच यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
मोठी बातमी:-Cotton: मे महिन्यात यावेळी लागवड करा कापुस आणि मिळवा दर्जेदार उत्पादन
मित्रांनो जर आपणास हा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर आपण हा व्यवसाय कमी गुंतवणुकीत देखील सुरू करू शकता. सुरुवातीला आपण 10 खोक्यांसह मधमाशी पालन करू शकता. एका पेटीत 40 किलो मध मिळाल्यास एकूण मध 400 किलो होईल. 350 रुपये प्रति किलो दराने 400 किलो विकल्यास 1.40 लाख रुपये मिळतील.
जर प्रति पेटीची किंमत रु.3500 आली तर एकूण खर्च रु.35,000 आणि निव्वळ नफा रु.1,05,000 होईल. मधमाशांची संख्या वाढल्याने हा व्यवसाय दरवर्षी 3 पटीने वाढतो. म्हणजेच 10 खोक्यांपासून सुरू केलेला व्यवसाय एका वर्षात 25 ते 30 बॉक्स पर्यंत पोहचू शकतो आणि तुम्ही सहज अधिक नफा कमवू शकता.
मोठी बातमी:-Cotton Farming : कापसाची शेती मिळवून देईल बक्कळ पैसा
Published on: 23 April 2022, 01:23 IST