केंद्र सरकार सर्वसामान्य लोकांचे आयुष्य सुखकर व्हावे यासाठी बऱ्याच प्रकारच्या योजना आणत आहे.यामध्ये आपल्याला माहित आहेच कि जर एखादा भविष्यामध्ये आरोग्याचा प्रश्न उद्भवला तर त्यासाठी लागणारे आर्थिक तरतुदी फार मोठी असावी लागते. त्यामुळे बरेच लोक आरोग्य विम्याचा आधार घेतात. परंतु विम्याच्या हप्त्याचा विचार केला तर सगळ्यांनाच ते परवडतील असे नसतात.
यासाठी केंद्र सरकारने सर्व सामान्यांच्या सोयीसाठी आयुष्यमान कार्ड योजना आणली असून या अंतर्गत लोकांना आरोग्य विमा पुरवला जातो. परंतु अजूनही बरेच लोकांना या योजनेविषयी पुरेशी माहिती नाही. त्यामुळे या लेखात आपण आयुष्यमान भारत योजने विषयी पूर्ण माहिती घेऊ.
आयुष्यमान कार्ड म्हणजे काय?
भारत सरकारच्या कुटुंब आणि आरोग्य कल्याण मंत्रालयाने प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आयुष्यमान भारत कार्ड जारी केले आहे.
याअंतर्गत लाभार्थ्याला दरवर्षी पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जातो. मात्र यासाठी लाभार्थींकडे आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक आहे. त्यासाठी हे कार्ड ऑनलाइन कसे काढावे याचे संपूर्ण प्रक्रिया आपण जाणून घेऊ.
आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे
आधार कार्ड,मोबाईल नंबर,उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र तसेच वय प्रमाणपत्र, ऍड्रेस प्रूफ इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते.
आयुष्यमान कार्ड ऑनलाईन कसे बनवावे पहा स्टेप बाय स्टेप
2- आयुष्यमान भारत कार्ड बनविण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आयुष्यमान भारत कागदाच्या अधिकृत वेबसाईट https://mera.pmjay.gov.in/search/login वर जावे लागेल.
2- या ठिकाणी तुम्हाला होमपेजवर दिलेल्या लॉगिन पर्यायांमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल व त्यानंतर तुम्हाला ओटीपी मिळेल याची पडताळणी करावी लागेल.
3- आता त्याचा डॅशबोर्ड उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला मेनू पर्यायावर क्लिक करावे लागेल.
नक्की वाचा:शेतकऱ्यांना कृषी यंत्रांवर 50 ते 80 टक्के अनुदान मिळणार, जाणून घ्या..
5- त्यानंतर pmjay-state Scheme चा पर्याय निवडावा. त्यानंतर तुमच्यासमोर आपला 'आयुष्यमान कार्ड थ्रू स्टेट स्कीम' हा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल.
6- त्यानंतर आमच्यासमोर एक फॉर्म येईल. त्यामध्ये तुम्ही ज्या क्षेत्रात अथवा राज्यात राहतात ते निवडावे लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज करण्याचा फॉर्म दिसेल व त्याला व्यवस्थित वाचून भरावा. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तो सबमिट करावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला अर्ज भरल्याची पावती मिळेल. त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक, आधार कार्ड, शिधापत्रिका तुमच्या जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात जाऊन पडताळणी करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला आयुष्यमान कार्ड दिले जाते. जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ते डाउनलोड करण प्रिंट देखील करू शकतात.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो आता शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी मिळणार एक लाख रुपये, असा घ्या लाभ...
Published on: 05 August 2022, 12:56 IST