Government Schemes

मित्रांनो देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशात वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme) देखील अशीच एक कल्याणकारी योजना आहे.

Updated on 06 June, 2022 9:52 PM IST

मित्रांनो देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशात वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme) देखील अशीच एक कल्याणकारी योजना आहे.

या योजनेबद्दल बोलायचे झाले तर ही योजना अरुण जेटली यांनी 2015 मध्ये आणली होती, या योजनेचा उद्देश असंघटित कुटुंबांना बळकट करणे व त्यांना आर्थिक मदत करणे हा आहे. जेणेकरून त्यांचे जीवन सुधारेल व ते स्वावलंबी बनतील.18 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेत नोंदणी केल्यानंतर त्याचा लाभ घेऊ शकते, म्हणून आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणुन घेऊया.

अटल पेन्शन योजना

अटल पेन्शन योजनेत तुम्हाला दरमहा पेन्शनची सुविधा दिली जाते. या योजनेत पती-पत्नी दोघेही कमावू शकतात. याशिवाय सरकारच्या या योजनेचा लाभ कोणीही घेऊ शकतो. आम्ही तुम्हाला केंद्र सरकारच्या जबरदस्त पेन्शन योजनेबद्दल आज माहिती सांगणार आहोत.

पंतप्रधान अटल पेन्शन योजनेचे फायदे

»या पेन्शन योजनेंतर्गत, खर पाहता ग्राहकांना किमान मासिक पेन्शन 1,000 ते 5,000 रुपये प्रति महिना मिळतं असते.

»पती-पत्नीचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणे महत्त्वाचे आहे.

»ही योजना अशा लोकांसाठी आहे ज्यांना आयकर भरावा लागत नाही.

»यासाठी केंद्र सरकारला ग्राहकांना काही पैसे द्यावे लागतात या योगदानाच्या 50% किंवा प्रति वर्ष 1,000 रुपये सरकार देत असते.

»या योजनेत खरं पाहिले तर, वयाच्या 60 वर्षानंतर जोडप्याला दरमहा 10 हजार रुपये सामूहिक पेन्शनचा लाभ दिला जातं असतो.

कोणीही लाभ घेऊ शकतो

अटल पेन्शन योजना ही मोदी सरकारची लोकप्रिय योजना आहे, ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1000 ते 5000 रुपयांपर्यंतची रक्कम नागरिकांना दिली जाते. पती-पत्नी दोघांनीही या योजनेत अर्ज केल्यास त्यांना 10,000 रुपयांचा लाभ मिळेल. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने म्हटले आहे की या योजनेअंतर्गत पती आणि पत्नी दोघेही ₹ 5000 च्या पेन्शन रकमेसाठी अर्ज करू शकतात.

प्रीमियम दरमहा भरावा लागेल

या योजनेत नागरिकांना दरमहा प्रीमियमची रक्कम भरावी लागते. अर्जदार 18 वर्षांचा असल्यास, त्याला दरमहा 210 रुपये प्रीमियम भरावा लागेल. दुसरीकडे हेच पैसे दर तीन महिन्यांनी दिल्यास 626 रुपये आणि सहा महिन्यांत 1239 रुपये द्यावे लागतील. याशिवाय दरमहा 1000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी वयाच्या 18 व्या वर्षी फक्त 42 रुपये द्यावे लागतील.

60 वर्षापूर्वी मृत्यू झाल्यास पैसे कोणाला मिळणार?

जर कोणत्याही कारणास्तव नागरिकाचा वयाच्या 60 व्या वर्षापूर्वी मृत्यू झाला तर या अटल पेन्शन योजनेचे पैसे नागरिकाच्या पत्नीला दिले जातील. कोणत्याही कारणास्तव पती-पत्नी दोघांचा मृत्यू झाल्यास या पेन्शनचे पैसे नामनिर्देशित नागरिकाला दिले जातील.

वयाच्या 42 व्या वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता

तुम्ही यामध्ये मासिक, त्रैमासिक आणि सहामाही गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला वयाच्या 42 वर्षापर्यंत गुंतवणूक करावी लागेल. 42 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 1.04 लाख रुपये असेल. 60 वर्षांनंतर तुम्हाला 5000 रुपये मासिक पेन्शन मिळेल. आयकर कलम 80CCD अंतर्गत, त्याला कर सवलतीचा लाभ मिळतो.

कुठे खाते उघडू शकतो

तुम्ही सदस्याच्या नावाने फक्त 1 खाते उघडू शकता. या योजनेत तुम्ही बँकेतून खाते उघडू शकता. पहिल्या 5 वर्षांसाठी योगदानाची रक्कमही सरकार देईल.

अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करावा

सर्व प्रथम, तुमचे बँक खाते असले पाहिजे, जर नसेल तर खाते उघडणे महत्वाचे आहे.

त्यानंतर तुम्हाला या पेन्शन योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.

अर्ज डाउनलोड करणे आणि प्रिंट करणे महत्वाचे आहे.

त्यानंतर अर्ज भरावा लागेल.

यासोबतच तुम्हाला आधार कार्डची छायाप्रतही द्यावी लागेल.

तसेच तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागेल.

आता तुम्हाला ते तुमच्या बँकेत जमा करावे लागेल.

अटल पेन्शन योजनेचे फायदे अनेक प्रकारे मिळू लागतात. याचा लाभ घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या संदर्भात, योजनेचा अनेक प्रकारे फायदा होतो.

English Summary: Atal pension scheme husband wife will get 10 thousand
Published on: 06 June 2022, 09:52 IST