केंद्र व राज्य सरकार विविध प्रकारच्या योजनांची आखणी व अंमलबजावणीयोग्य रीतीने करत आहेत.अशा बऱ्याच योजना आहेत हे ज्यांच्या माध्यमातून अगदी लहान मूल ते वृद्ध व्यक्ती यांचे हित साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
वृद्ध व्यक्ती म्हणजेच ज्येष्ठ नागरिकयांचा भविष्यकाळआणि आयुष्याचे शेवटचे दिवस खूपछान व आनंदात जावेयासाठीशासन विविध स्तरावर आणि योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे दिसते. अशीच एक योजना केंद्र सरकारने सुरू केले असून या योजनेचे नाव आहे अटल पेन्शन योजना हे होय. या सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक करून मासिक पेन्शन यामध्ये मिळवू शकतात. सन 2015 मध्ये केंद्र सरकारने ही योजना सुरू केली असून हा संघटित कुटुंबांना भक्कम आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
काय आहे नेमकी ही योजना?
या योजनेमध्ये पती आणि पत्नी ला मिळून दहा हजार रुपयांपर्यंतचा पेन्शनचा लाभ मिळू शकतो. असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांचा वृद्धापकाळ चांगला जावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. तो आता भारतात करणारी कोणतीही व्यक्ती या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकते. वयाची 18 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकता. वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर या योजनेच्या माध्यमातूनपाच हजार रुपये मासिक पेन्शन याचा लाभ मिळवता येणे शक्य आहे.यासाठी दरमहा 200 रुपये जमा करावे लागतात.
या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये इन्कम टॅक्स कायदा 80 cनुसार अटल पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतचा टॅक्स बेनिफिट मिळतो. तसेच काही प्रकरणांमध्ये पन्नास हजार रुपयांपर्यंतचा एक्स्ट्रा टॅक्स फायदा देखील मिळतो. म्हणजेच एकूण दोन लाख रुपयांपर्यंतचे सुट यामध्ये मिळू शकते. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पती किंवा पत्नी यापैकी एकाचा साठ वर्षे पूर्ण होण्याच्या अगोदर मृत्यू झाला तर त्याची पती किंवा पत्नी ही योजना सुरू ठेवू शकतात आणि पेन्शनचा लाभ घेऊ शकता. दोघांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या नॉमिनी ला एकरकमी रक्कम मिळते. या योजनेच्या माध्यमातून 1000, 2000 हजार, 3000, 4000 आणि कमाल पाच हजार रुपये मासिक पेन्शन मिळते.रजिस्ट्रेशन करून या योजनेचा लाभ घेता येतो.
या योजनेत सहभाग कसा घ्यावा?
या योजनेत रजिस्ट्रेशन साठी तुमच्याकडे बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला अटल पेन्शन योजनेचा फॉर्म डाउनलोड करावा लागतो. त्यासाठी….
1- तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन या योजनेचा फॉर्म मिळवू शकताकिंवा या योजनेमध्ये सहभागी असलेल्या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून या फार्म ची प्रिंट आउट डाऊनलोड करू शकता.
2- पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी च्या अधिकृत संकेतस्थळावरून देखील या योजनेचा फॉर्म डाउनलोड करता येतो.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:मुंबईसाठी २२ दिवस धोकादायक! मुंबईची होऊ शकते तुंबई ?
नक्की वाचा:शेतकरी बंधूंनो! बीजप्रक्रिया आहे महत्वाची, वापरा या सोप्या पद्धती अन पिक ठेवा निरोगी
Published on: 16 May 2022, 01:10 IST