केंद्र सरकार आणि राज्य सरकार (Central and State Government) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतं. अशीच एक सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Fund) राबविली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते.
ही रक्कम प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. मात्र अनेक अपात्र शेतकरी या योजनेचा लाभ घेताना दिसून आले. यासंदर्भांत आता एक नवी माहिती समोर आली असून तब्बल 9,000 पेक्षा अधिक मृत शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान (pm kisan) रक्कम जमा झाली आहे. एका नवीन अहवालानुसार, उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील 9,000 हून अधिक मृत शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळाली आहे.
वातावरणामुळे ऊस पिकाचे नुकसान; तर त्वरित उसावरील पाकोळी किडीचे करा व्यवस्थापन
मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांकडून पैसे वसूल होणार
यासंदर्भात माहिती देताना फिरोजाबाद जिल्हा कृषी अधिकारी हरनाथ सिंह म्हणाले की, या योजनेत नोंदणीकृत शेतकरी सुमारे ९६,००० असल्याने ही संख्या आणखी वाढू शकते. ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, महसूल विभागाची पथकेही मृत शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती संकलित करण्यात गुंतलेली आहे. त्यांची ओळख पटताच यादीतून त्यांची नावे काढून टाकली जातील आणि ज्या कुटुंबांना या योजनेतून चुकीच्या पद्धतीने पैसे (PM Kisan) मिळाले आहेत त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील.
मोठी बातमी: 'या' योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर शेतकऱ्यांना मिळणार 50 % अनुदान
पीएम किसान 12 व्या हप्त्याची तारीख
12 वा हप्ता कधी येणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 12 व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. आता लवकरच म्हणजे ऑगस्ट महिन्यात 2,000 रुपयांचा पुढील हप्ता दिला जाण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
अलर्ट ! राज्यात उद्यापासून कोकण मुंबईसह 'या' ठिकाणी चार दिवस मुसळधार पाऊस
पशुपालकांसाठी आनंदाची बातमी; आता गाईच्या शेणानंतर सरकार खरेदी करणार गाईचे गोमूत्र
मोठी बातमी; अकाऊंटमध्ये झीरो रक्कम असली तरी काढता येणार, पहा प्रोसेस..
Published on: 22 July 2022, 11:52 IST