National Live Stock Mission: भारतामध्ये शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच शेतीबरोबर व्यवसाय म्हणून शेतकरी (Farmers) दुग्धव्यवसाय (Dairying) करत आहे. त्यामुळे त्यांना अधिक नफा मिळत आहे. त्यातच आता देशात दुधाचे दर चांगलेच कडाडले आहेत. त्यामुळे दुग्धव्यवसायिकांचे चांगले दिवस आले आहेत.
दुग्धव्यवसाय करता असताना जनावरांना हिरवा किंवा सुकलेला चारा खूप गरजेचा असतो. मात्र जनावरांना तो कापून टाकावा लागतो. यासाठी पशुपालकांना कुट्टी मशीनची (chaffcutter) गरज असते. मात्र बाजारात कडबा कुट्टी मशीनची किंमत खूप असल्यामुळे ते शेतकऱ्यांना परवडत नाही. मात्र आता याच कुट्टी मशीनवर सरकारकडून सबसिडी दिली जात आहे.
केंद्र सरकारकडून (Central Goverment) शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्याचा फायदा देशातील लाखों शेतकऱ्यांना होत आहे. नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन (National Live Stock Mission) या योजनेअंतर्गत कुट्टी मशीनवर अनुदान दिले जात आहे.
राज्यावर अजूनही मुसळधार पावसाचे सावट! ११ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मिला केंद्र सरकडून अनेक निर्णय घेतले जात आहेत. पशुपालकांना केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत कमी दरात चारा कापण्याचे यंत्र दिले जात. अधिकाधिक पशुपालक आणि शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहचण्यासाठी सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू केले आहे.
या अभियानांतर्गत चारा कटिंग मशिनवर ऊर्जा कार्यक्षम चारा उपकरणे यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान दिले जाते. त्याचबरोबर हाताने चालणाऱ्या मशीनवर ७० टक्के अनुदान दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात कुट्टी मशीन उपलब्ध होत आहे.
जर कुट्टी मशीन यंत्राची किंमत २०,००० रुपये असेल तर यामागे केंद्र सरकारच्या योजनेतून १०,००० पर्यंतचे अनुदान दिले जात आहे. सरकारच्या अशा योजनांमुळे शेतकऱ्यांना निम्म्या किमतीमध्ये चारा कुट्टी मशीन उपलब्ध होत आहे. या योजनेचा लाभ अत्यल्प भूधारक शेतकरीच घेऊ शकतात.
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! मुसळधार पाऊस थांबताच कपाशीवर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव...
चारा यंत्रावर अनुदान लाभार्थी निवडण्यासाठी अटी व शर्ती
केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेयचा असेल तर त्यांच्या काही अति आणि नियम आहेत. त्या पूर्ण करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. जाणून घेऊया अटी आणि शर्ती
१. इलेक्ट्रिक कुट्टी मशीनसाठी पशुपालकाकडे किमान ५ सस्तन प्राणी आवश्यक आहे.
२. हाताने चालणाऱ्या कुट्टी मशीनचा लाभ घेईल असेल तर २ सस्तन प्राणी असणे आवश्यक आहे.
३. तसेच शेतकरी हा अल्पभूधारक शेतकरी असावा.
असा करा अर्ज
जर तुम्हालाही लाभ घेईल असेल तर तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी मानव विकास कार्यालयात अर्ज करू शकता. तसेच या योजनेची अधिक माहिती हवी असेल तर nlm.udyamimitra.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसेच जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाकडूनही या संदर्भात माहिती मिळवू शकता.
महत्वाच्या बातम्या:
खुशखबर! सणासुदीच्या मुहूर्तावर मिळणार 18 महिन्यांची थकबाकी! कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 4 टक्क्यांनी वाढ
Gold Price Today: सोन्या चांदीच्या किमतींमध्ये वाढ! तरीही सोने 4600 आणि चांदी 24800 रुपयांनी मिळतंय स्वस्त...
Published on: 25 August 2022, 11:04 IST