Government Schemes

केंद्र सरकारने आपत्ती निवारण मदत रकमेत 20 वरून 50 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. पाऊस, पूर आणि हिमस्खलनाचा सामना करणाऱ्या लाखो लोकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पिके, घरे, रुग्णालये, शाळा आणि पंचायत इमारतींचे नुकसान तसेच वैयक्तिक शारिरीक नुकसानामध्ये ते फायदेशीर ठरेल.

Updated on 14 October, 2022 4:22 PM IST

केंद्र सरकारने आपत्ती निवारण मदत रकमेत 20 वरून 50 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. पाऊस, पूर आणि हिमस्खलनाचा सामना करणाऱ्या लाखो लोकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पिके, घरे, रुग्णालये, शाळा आणि पंचायत इमारतींचे नुकसान तसेच वैयक्तिक शारिरीक नुकसानामध्ये ते फायदेशीर ठरेल.

मच्छिमार, हस्तकलाकार, हातमाग कलाकारांना नुकसानीपोटी दिल्या जाणाऱ्या मदतीच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. घरांचे संपूर्ण विध्वंस किंवा नुकसान आणि जनावरांच्या मृत्यूसाठी देण्यात येणाऱ्या मदत रकमेतही वाढ करण्यात आली आहे. मात्र, मृत्यूनंतर नातेवाईकांना मिळणाऱ्या मदतीच्या रकमेत कोणतीही वाढ झालेली नाही.

३३% किंवा त्यापेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाल्यास, बागायत क्षेत्रात प्रति हेक्टर ६,८०० ऐवजी आता ८,५०० रुपये आणि खात्रीशीर बागायत क्षेत्रात १३,५०० ऐवजी १७,००० रुपये प्रति हेक्टर मिळतील. ही वाढ अनुक्रमे 25 आणि 20% आहे. यामुळे अतिवृष्टी आणि पुरामुळे दिलासा मिळणार आहे. गृह मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातील संचालक, पवन कुमार यांनी राज्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाची ऑनलाईन यादी जाहीर, शेतकऱ्यांनो तुमचं नाव करा चेक..

सध्या पूर आणि अतिवृष्टीच्या परिस्थितीत नवीन दराने मदत दिली जाईल. सुधारित दर 2022-23 या आर्थिक वर्षापासून लागू होतील. केंद्र सरकारने राज्यांना सांगितले आहे की सर्व एकल लाभार्थी सहाय्य लाभार्थीच्या बँक खात्यात DBT द्वारे उपलब्ध करून द्यावे. दोन वर्षांनी निकषांचा मध्यावधी आढावा घेतला जाईल. याचा अनेकांना फायदा होणार आहे.

मृताच्या निकटवर्तीयांना: पूर्वीप्रमाणे 4 लाख रुपये.
40-60% अपंगत्व: रु. 59,100 ऐवजी रु.74,000.
60% पेक्षा जास्त अपंगत्व: 2.50 लाख भरपाई.

Maharashtra Monsoon: उद्यापासून परतीचा मान्सून माघारी फिरणार, शेतीच्या कामांना येणार वेग..

खोल जखमांवर: रु. 12,700 ऐवजी 16,000 रु. गंभीर जखमींना 4,300 ऐवजी 5,400 रु.
आपत्तीमध्ये घराचे नुकसान झाल्यास: कपड्यांसाठी रु. 2,500 आणि घरगुती वस्तूंसाठी रु. 2,500.
शेतजमिनीतील ढिगारा हटवण्यासाठी, मत्स्य फार्मची दुरुस्ती: 12,200 ऐवजी 18,000 रुपये प्रति हेक्टर. प्रति शेतकरी किमान 2,200 मदत.

महत्वाच्या बातम्या;
दिवाळीच्या तोंडावर शिंदे सरकार देणार वीज दरवाढीचा शॉक, वीज दरवाढ होणार
आता निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सुध्दा मिळणार मदत, राज्य सरकारचा मोठा निर्णय
Farmer Income: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत असल्याचे माझ्याकडे पुरावे, केंद्रीय कृषिमंत्र्यांचा दावा

English Summary: 50% increase in disaster relief amount, compensation given case flood rain crop damage
Published on: 14 October 2022, 04:22 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)