राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची महात्मा ज्योतीबा फुले या योजनेअंतर्गत कर्जमाफी केली त्यावेळी ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये देण्याचे देखील जाहीर केले होते. मात्र सरकार बदलल्यानंतर पैसे मिळणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते.
आता 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ येाजनेचा शुभारंभ दि. 20 ऑक्टोबर, 2022 रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिली. यामुळे अखेर हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017 - 18, सन 2018 - 19 काळात मान्यता देण्यात आली.
कोरोना महामारी मुळे राज्य सरकारच्या महसूलात मोठा तुटवडा जाणवला होता. परिणामी राज्य सरकारने मागील दोन वर्षात दीड लाख कोटीहून अधिकचे कर्ज काढले. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत देण्यास विलंब झाला. आतापर्यंत सुमारे 7. 15 लाख पात्र खातेदारांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे.
Diwali: या राज्यांमध्ये दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी, भरावा लागणार दंड
कोरोना काळात ज्याप्रमाणे राज्य सरकार कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले अगदी त्याच पद्धतीने बळीराजा देखील मागील दोन वर्षात भरडला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचा आग्रह देखील धरला जात होता. त्याप्रमाणे सरकारने हालचाली केल्या होत्या.
किसान सन्मान निधीचे २ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा..
आता अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केल्याबदल निवडक पात्र शेतकरी बांधवांना प्रोत्साहन प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचेही मंत्री सावे म्हणाले. हे पैसे तीन टप्प्यात शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या;
दिवाळीनंतर कांदा ५० रुपयांवर जाणार, व्यापाऱ्यांनी व्यक्त केला अंदाज..
शेतकऱ्यांकडे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पीक विमा कंपनीकडून पैशाची मागणी
ओडिशाचे सर्वात मोठे कृषी प्रदर्शन; कृषी उन्नती परिषद सुरू, कृषी जागरणतर्फे आयोजन
Published on: 18 October 2022, 10:24 IST