Government Schemes

सध्या राज्यात नव्याने १०२३ शेततळ्यांची खोदाई करणाऱ्या शेतकऱ्यांना साडेसहा कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. आता मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेतून नव्या शेततळ्यांची खोदाई करण्यासाठी ४६ कोटी रुपये विविध जिल्ह्यांना उपलब्ध करून दिले आहेत.

Updated on 15 July, 2023 12:34 PM IST

सध्या राज्यात नव्याने १०२३ शेततळ्यांची खोदाई करणाऱ्या शेतकऱ्यांना साडेसहा कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. आता मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेतून नव्या शेततळ्यांची खोदाई करण्यासाठी ४६ कोटी रुपये विविध जिल्ह्यांना उपलब्ध करून दिले आहेत.

पावसामुळे नव्या शेततळ्यांची खोदाई शेतकऱ्यांनी तूर्त थांबवली आहे. मात्र दिवाळीनंतर या योजनेला पुन्हा गती मिळेल. कृषी आयुक्तालयाने या योजनेतील ऑनलाइन त्रुटींचा अभ्यास करीत त्या दूर केल्या आहेत.

त्यामुळे योजनेत सुटसुटीतपणा आला आहे. दरम्यान, मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन विभागाचे संचालक रवींद्र भोसले व सहसंचालक पांडुरंग शेळके यांच्याकडून शेततळे योजनेला वेग देण्यासाठी सातत्याने आढावा घेतला जात आहे.

शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले की टोमॅटोचे दर कमी करण्यासाठी सरकारच्या हालचारी सुरू! आयुक्तांकडून बैठक

शेतकऱ्यांनी १७०० शेततळ्यांची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड केली आहेत. यातील ५०० तळ्यांचे अनुदान अदा करण्यास मंजुरी मिळाली आहे. शेततळे खोदाईत पुणे विभाग आघाडीवर आहेत.

कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी यांच्याकडून आयुक्तालयापासून ते थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत या योजनेचा पाठपुरावा सुरू आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय. राज्यात शेततळ्यासाठी ५५ हजार शेतकऱ्यांना सोडत लागलेली आहे.

कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता, दुष्काळी भागाला पाणी मिळणार

त्यापैकी १५ हजार शेतकऱ्यांनी तळे खोदाईची तयारी दर्शविली. दरम्यान, शेततळ्यांसाठी जिल्हानिहाय देण्यात आलेले अनुदान वापरले न गेल्यास निधी परत जात नाही. त्याऐवजी शिल्लक निधी गरज असलेल्या जिल्ह्यांना पाठविला जात आहे.

डाळींबाची कोण जात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त, जाणून घ्या..
मला न विचारता टोमॅटो का वापरले.? बायकोला आला राग आणि नवऱ्याला सोडून गेली माहेरी....
सदाभाऊ टोमॅटोच्या दरावरुन आक्रोश करणाऱ्या शहरी नागरिकांवर भडकले, म्हणाले थोड्या दिवसांनी सरण रचायलाही टोमॅटो देऊ...

English Summary: 46 crore fund for new farms, farmers will benefit
Published on: 15 July 2023, 12:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)