Government Schemes

पीक विमा संरक्षणअंतर्गत रिस्क वाढविण्यासाठी पूर्वीच्या विमा योजना मागे घेतल्यानंतर 1 एप्रिल 2016 पासून प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) लाँच करण्यात आली. मात्र आता या योजनेतील पाच वर्षांची आकडेवारी समोर आली आहे.

Updated on 23 July, 2022 2:38 PM IST

पीक विमा संरक्षणअंतर्गत (Crop insurance coverage) रिस्क वाढविण्यासाठी पूर्वीच्या विमा योजना (Insurance plan) मागे घेतल्यानंतर 1 एप्रिल 2016 पासून प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) लाँच करण्यात आली. मात्र आता या योजनेतील पाच वर्षांची आकडेवारी समोर आली आहे.

प्रधानमंत्री फसल विमा योजनेतील (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) पाच वर्षांची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीवरुन योजनेतील नेमके लाभार्थी कोण? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

हे ही वाचा 
Organic Fertilizers: अवघ्या 18 दिवसात शेतकऱ्यांचे जीवन बदलेल; 'या' सेंद्रिय खताची होतेय चर्चा

गेल्या पाच वर्षांमध्ये योजनेंतर्गत विमा कंपन्यांनी थोडे थोडकी नव्हे तर, तब्बल 40 हजार कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. केंद्राच्या प्रमुख पीक (Crop) विमा योजनेंतर्गत असलेल्या या योजनेत विमा (Insurance plan) कंपन्यानी भरघोस कमाई केली आहे.

प्रधानमंत्री फसल विमा योजना 2016-17 मध्ये स्थापन झाली आहे. योजना स्थापन झाल्यापासून खरीप 2021-22 मधील डेटा समोर आला आहे. राज्यसभेत कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी याबाबत आकडेवारीसह माहिती दिली आहे.

हे ही वाचा 
शेतकऱ्यांचे अच्छे दिन! फ्लॉवरच्या 'या' वाणाच्या लागवडीतून शेतकरी घेतोय लाखोंमध्ये उत्पन्न

त्यानुसार विमा कंपन्यांनी या कालावधीत योजनेंतर्गत एकूण 1,59,132 कोटी रुपयांच्या प्रीमियम (Premium) कलेक्शनविरुद्ध शेतकर्‍यांना 1,19,314 कोटी रुपयांचे दावे दिले आहेत. या योजनेचा लाभ कोट्यवधी शेतकऱ्यांना (farmers) झाला असला तरी खासगी कंपन्यांसह विमा कंपन्यांसाठीही ही योजना फायद्याची ठरत आहे.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांचे अच्छे दिन! फ्लॉवरच्या 'या' वाणाच्या लागवडीतून शेतकरी घेतोय लाखोंमध्ये उत्पन्न
मोठी बातमी! पशुपालकांसाठी घरपोच पशुरुग्ण सेवा; 'या' टोल फ्री क्रमांकावर साधा संपर्क
बाप रे बाप! बाजारपेठेत मटनापेक्षा महाग मशरूम; जंगली मशरूमची होतेय चर्चा

English Summary: 40000 crores earned insurance companies 5 years
Published on: 23 July 2022, 02:26 IST