Government Schemes

पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांचा वापर टॅक्स वाचवण्यासाठी केला जातो. अशा खूप कमी पोस्ट ऑफिसच्या योजना आहेत ज्यात दोन्ही वैशिष्ट्ये आहेत म्हणजेच व्याज, परतावा आणि परिपक्वतेवर कर सूट.

Updated on 25 August, 2022 5:15 PM IST

पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांचा वापर टॅक्स (tax) वाचवण्यासाठी केला जातो. अशा खूप कमी पोस्ट ऑफिसच्या योजना आहेत ज्यात दोन्ही वैशिष्ट्ये आहेत म्हणजेच व्याज, परतावा आणि परिपक्वतेवर कर सूट.

ज्या लोकांना भविष्यासाठी गुंतवणूक करायची आहे. अशा लोकांसाठी या योजना अत्यंत फायदेशीर आहेत. चला तर आपण आज जाणून घेऊया करमुक्त असलेल्या योजनेविषयी.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)

या योजनेत कर-बचत आणि करमुक्त अशी दोन्ही वैशिष्ट्ये आहेत. एक गुंतवणूकदार खाते (Investor Account) उघडू शकतो आणि एका आर्थिक वर्षात PPF मध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकतो आणि आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत गुंतवणूकीच्या रकमेवर कपातीचा दावा करू शकतो. PPF वर मिळणारे व्याज आणि परिपक्वता रक्कम देखील करमुक्त आहे.

Red Kandhari: पशूपालकांचे दूध उत्पन्न वाढणार; 'लाल कंधारी' गाय 275 दिवस देते दूध

सुकन्या समृद्धी योजना (SSY)

मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक पोस्ट ऑफिसमध्ये (post office) सुकन्या समृद्धी योजना खाते उघडू शकतात आणि एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये जमा करू शकतात आणि गुंतवणुकीच्या रकमेवर कलम 80C अंतर्गत कपातीचा दावा करू शकतात. PPF प्रमाणेच या योजनेत देखील करमुक्त व्याज आणि परिपक्वता सह वैशिष्ट्ये आहेत.

पोस्ट ऑफिस बचत खाते

पोस्ट ऑफिस बचत खात्यातील ठेवींवर कर बचतीचे फायदे नाहीत किंवा व्याज करमुक्त नाही. ठेवीदारांना आयकर कायद्याच्या कलम 10(15)(i) अंतर्गत मिळणाऱ्या व्याजावर एकल खात्यांमध्ये 3,500 रुपयांपर्यंत आणि संयुक्त खात्यांमध्ये 7,000 रुपयांपर्यंतच्या व्याजावर कर सूट मिळू शकते.

Sweet Potato: रताळ्याचे सेवन केल्याने बीपी राहतो नियंत्रित; आणखी आहेत आश्चर्यकारक फायदे

राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS)

पोस्ट ऑफिस NPS सेवा प्रदात्यांसाठी पॉइंट ऑफ प्रेझेन्स (Point of Presence) म्हणून काम करते. त्यामुळे NPS मध्ये गुंतवणूक करू इच्छिणारे गुंतवणूकदार खाते उघडण्यासाठी नियुक्त पोस्ट ऑफिस शाखेला भेट देऊ शकतात.

NPS टियर-1 खात्यांमध्ये स्वैच्छिक गुंतवणुकीसाठी कलम 80 CCD(1B) अंतर्गत गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात 50,000 रुपयांपर्यंतच्या कपातीचा दावा करू शकतात. NPS अंतर्गत रिटायरमेंट कॉर्पसमधून परतावा आणि एकरकमी कम्युटेशन करमुक्त आहेत.

महत्वाच्या बातम्या 
Crop Management: शेतकऱ्यांनो भाजीपाल्यांचे करा योग्य व्यवस्थापन; उत्पादनात होईल दुप्पट वाढ
Onion Machine: आता शेतकऱ्यांचे नुकसान टळणार; कांदा सडतोय सांगणारे उपकरण लॉन्च
Castor Crop: एरंड पिकाची लागवड करा आणि कमी खर्चात मिळवा आश्चर्यकारक नफा

English Summary: 4 post office schemes tax free
Published on: 25 August 2022, 04:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)