Government Schemes

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार नवनवीन योजनांची अंमलबजावणी करत असते. केंद्र सरकारच्या अनेक योजणांपैकी पीएम किसान योजनेला शेतकऱ्यांनी पसंती दर्शविली आहे. जर तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

Updated on 22 July, 2022 12:35 PM IST

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार नवनवीन योजनांची अंमलबजावणी करत असते. केंद्र सरकारच्या अनेक योजणांपैकी पीएम किसान योजनेला शेतकऱ्यांनी पसंती दर्शविली आहे. जर तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

PM मोदी लवकरच PM किसान योजनेचा 12वा हप्ता जारी करणार आहेत. पीएम किसानचा पुढचा हप्ता ऑगस्टमध्ये येणार आहे. आतापर्यंत आपण पाहिले तर, या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान, तर दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान दिला जातो. त्याच वेळी, तिसऱ्या हप्त्याचे पैसे 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान हस्तांतरित केले जातात. त्यानुसार या महिन्याच्या अखेरीस पीएम किसानचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो.

महत्वाचे म्हणजे तुम्ही जर ई-केवायसी करून घेतली नसले तर तुमचा हप्ता अडकू शकतो. यासह तुम्ही आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांना किसान कॉर्नरमधील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करावे लागेल. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी लागेल. हे काम तुम्ही तुमच्या मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून घरी बसूनही करू शकता.

वातावरणामुळे ऊस पिकाचे नुकसान; तर त्वरित उसावरील पाकोळी किडीचे करा व्यवस्थापन

प्रक्रिया

1) आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी किसान कॉर्नरमधील 'EKYC' पर्यायावर क्लिक करा
2) बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा.
3) तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने ते घरी बसून पूर्ण करू शकता.
4) यासाठी प्रथम तुम्ही https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
5) उजव्या बाजूला तुम्हाला असे टॅब आढळतील. सर्वात वर तुम्हाला e-KYC लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा.

मोठी बातमी: 'या' योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर शेतकऱ्यांना मिळणार 50 % अनुदान

तुमची हप्त्याची स्थिती अशी तपासा

1) हप्त्याची स्थिती पाहण्यासाठी, तुम्ही पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.
2) आता Farmers Corner वर क्लिक करा.
3) आता लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा.
4)आता तुमच्यासोबत एक नवीन पेज उघडेल.
5) येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.
6) यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

महत्वाच्या बातम्या 
धक्कादायक ! 'या' योजनेच्या 9 हजार मृत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा
अलर्ट ! राज्यात उद्यापासून कोकण मुंबईसह 'या' ठिकाणी चार दिवस मुसळधार पाऊस
पशुपालकांसाठी आनंदाची बातमी; आता गाईच्या शेणानंतर सरकार खरेदी करणार गाईचे गोमूत्र

English Summary: 12th installment PM Kisan Yojana come
Published on: 22 July 2022, 12:26 IST