Government Schemes

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना (scheme) राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळतो. यामधीलच एक योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme).

Updated on 27 August, 2022 10:37 AM IST

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना (scheme) राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळतो. यामधीलच एक योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme).

या योजनेअंतर्गत सरकार (government) शेतकऱ्यांसाठी मोठे अनुदान देत असते. या योजनेअंतर्गत सलग लागवड, बांधावर लागवड, पडीक जमिनीवर लागवड, रोहयो अंतर्गत फलबाग व इतर वृक्ष लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना 3 वर्षात 100 टक्के अनुदान दिले जाते.

या योजनेविषयी शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहचवावी असे आवाहन कृषी सहसंचालक यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत कोणते पिके घेऊ शकता. याविषयी आपण माहिती घेऊया.

फळ पिके लागवड

या योजनेअंतर्गत आंबा, काजू, चिकू, पेरु,डाळींब, सिताफळ, संत्रा, मोसंवी, लिंबू, नारळ, बोर, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, सुपारी, केळी, ड्रॅगनफ्रूट, अव्हाकॅडा, द्राक्ष इत्यादी फळपीके तसेच बांबू, साग, करंज, गिरीपुष्प, शेवगा, अंजन, खैर, ताड, निलगिरी, तुती, रबर, नीम, महोगुणी, शिसव, महुआ, चिनार, शिरीष, करवंद, गुलमोहर, इत्यादी वृक्षांची तसेच मसाला पिके जसे लवंग, मिरी, जायफळ, दालचिनी व औषधी वनस्पती (अर्जुन, आइन, असन, अशोक, बेल, गुग्गुळ, लोध्रा, शिवन, रक्तचंदन, टेटू, बेहडा, बिब्बा, डिकेमाली, हिरडा, रिठा, वावडींग, करंज, पानपिंपरी) वृक्षांची लागवड करता येते.

Crop Management: शेतकऱ्यांनो भाजीपाल्यांचे करा योग्य व्यवस्थापन; उत्पादनात होईल दुप्पट वाढ

फुलपिके लागवड

सन 202-21 पासुन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर फुलपिके लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या शेतावर निशिगंध मोगरा, गुलाब, सोनचाफा या फुलपिकाची लागवड (Cultivation of flowers) करता येईल. फुलपिकांच्या बाबत लाभार्थ्यांना एकाच वर्षात 100% अनुदान दिले जाईल.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या 4 योजना आहेत करमुक्त; परतावा देखील मिळतो दुप्पट

प्रक्रिया

संपूर्ण लागवड कार्यक्रमासाठी पुर्व हंगाम मशागत (Cultivation of the season) करणे, खड्डे खोदणे, झाडांची लागवड करणे, पाणी देणे, किटकनाशके, औषधे फवारणी व झाडाचे संरक्षण करणे इ. कामे लाभधारकाने स्वत: नरेगा अंतर्गत तयार श्रमिक गटद्वारे व जॉब कार्डधारक मंजुरांकडून करुन घ्या.

तसेच 7/12 उताऱ्यावर लागवड केलेल्या फुलपिकांची नोंद घेणे लाभार्थ्यांवर बंधनकारक राहील. सर्व फळपिके व फुलपिके लागवडीचा कालावधी 1 जून ते 31 डिसेंबरपर्यंत राहील. याबाबत अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.

महत्वाच्या बातम्या 
Honey Farming: मधपालनासाठी शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदान; जाणून घ्या प्रक्रिया
सावधान! शारीरिक कष्ट आणि सावधगिरी बाळगण्याचा आजचा दिवस; वाचा तुमचे राशीभविष्य
Farmers Subsidy: शेतकऱ्यांना औषधे, तणनाशके आणि कीड नियंत्रणासाठी मिळणार 50 टक्के अनुदान

English Summary: 100 percent subsidy farmers orchards flower farming
Published on: 27 August 2022, 10:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)