शेतकरी बंधूंनो जर तुम्हाला तुमच्या शेतजमिनीची मोजणी कमी श्रमात करायचे असेल तर आता तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या मोजमाप करणाऱ्या व्यक्तीची गरज भासणार नाही.
या लेखामध्ये आपण अशी माहिती पाहणार आहोत, ज्या माहिती च्या सहाय्याने तुम्ही काही मिनिटात तुमच्या शेतजमीन मोजू शकतात. यासाठी शेतकऱ्याकडे फक्त एक स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट आणि जीपीएसच्या सुविधा असेल.
स्मार्ट फोनच्या माध्यमातून अशा प्रकारे करतात
जमिनीचे मोजमाप
या पद्धतीत एका मोबाइल अँप्लिकेशनच्या माध्यमातून जमिनीचे मोजमाप केले जाते. एप्लीकेशन साठी तुम्हाला तुमच्या फोनमधील गुगल प्ले स्टोअर वर जाऊन त्यानंतर 'अंतर आणि क्षेत्र मापन' नावाचे अप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनचा जीपीएस ऑन करून हे ॲप्लिकेशन ओपन करावे लागेल. तुमच्या मोबाईल मध्ये 'अंतर आणि क्षेत्र मोजमाप'नावाचे अप्लीकेशन उघडल्यानंतर अंतर, मिटर,फूट, यार्ड इत्यादी मोजमापपैकी एक निवडावे लागेल.
नक्की वाचाइको-पेस्ट ट्रॅप लावा आणि करा पिकांचे कीटकांपासून रक्षण,फवारणीची नाही गरज
जर शेतकरी बांधव शेत जमिनीचे मोजमाप करत असतील तर ते क्षेत्रासाठी एकर निवडू शकतात. त्यानंतर तुम्हाला तळाशी एक स्टार्ट बटन दिसेल. ते बटन दाबून तुम्हाला जमीन मोजण्यासाठी जमिनी भोवती पूर्ण एक फेरी मारावी लागेल.
यामध्ये लक्षात ठेवण्यासारखे महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जमिनीच्या काठावर जेवढे मोजमाप करावे लागेल तेवढेच फिरावे लागेल. तुमची एक फेरी पूर्ण होताच तुम्हाला तुमच्या जमिनीचा पूर्ण आकार कळेल.
नक्की वाचा:पिक लागवड:अवघ्या 4 महिन्यात कमवू शकता 2 लाख रुपये, 'या' पिकाची लागवड ठरेल टर्निंग पॉइंट
या पद्धतीचे सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला जमीन मोजणी साठी लागणारा खर्च आणि वेळ या दोन्हींमध्ये बचत होईल तसेच शेती मोजण्यासाठी तुम्हाला भूमिअभिलेख विभागाकडून येणाऱ्या जमीन मोजणी अधिकाऱ्यांचे देखील गरज भासणार नाही. तुम्ही अगदी सहजरीत्या तुमच्या शेताचे मोजमाप करु शकतात.
Published on: 09 July 2022, 04:02 IST