भारत हा उष्ण कटिबंधीय प्रदेशात येतो आणि अशा प्रदेशांमध्ये शीतकरणची प्रक्रिया ही अत्यंत खर्चिक असते. तसेच ग्रामीण भागामध्ये विजेचा लपंडाव हा सतत चालू असल्यामुळे यामध्ये सर्वात मोठी समस्या निर्माण होते.
यावर मात म्हणून कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचा वापर न करता शीतकरण करता येईल असे तंत्रज्ञान मॅसेच्युसेट्स येथील संशोधकांनी काही दिवसांपूर्वी विकसित केले आहे. त्याद्वारे अन्नधान्य आणि औषधांचा सुद्धा साठा हा चांगल्या पद्धतीने करता येईल. या लेखात आपण या तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेणार आहोत.
कोणत्याही ऊर्जेशिवाय शीतकरण, काय आहे हे तंत्रज्ञान?
- प्रामुख्याने या तंत्रज्ञानामध्ये प्रकाशामध्ये असलेले मध्य अवरक्त किरण आतील उष्णतेच्या उत्सर्जनाचा वापर केला जातो. अवकाशातून येणाऱ्या प्रकाशाचा काही भाग हा वातावरणातील वायूंच्या थरांमध्ये शोषला जात असला तरी सरळ येणाऱ्या प्रकाशातील काही उष्णतेला रोखण्यासाठी या यंत्रणेमध्ये वरच्या भागात धातूची एक लहान पट्टी लावलेले आहे.
- या तंत्रज्ञानाने सामान्य तापमानापेक्षा जवळजवळ 20 अंश सेल्सिअस तापमान आहे आपल्याला कमी करता येते. विविध उपकरणांसाठी यापेक्षा अधिक शीतकरण आवश्यक असले तरी उरलेल्या तापमानातील घट ही पारंपारिक रेफ्रिजरेशन किंवा थरमोईलेक्ट्रिक शीतकरणा द्वारे शक्य होऊ शकते.
- या अगोदर काही संशोधकांनी या तंत्रज्ञानावर काम केले आहे परंतु त्यांच्या प्रणाली या गुंतागुंतीच्या फोटॉनिक उपकरणावर आधारित असल्याने त्या परवडणे योग्य नाहीत. ही उपकरणे सर्व तरंगलांबीच्या सूर्यप्रकाश परावर्तित करण्यासाठी बनवले आहेत.
- त्यातील केवळ मध्य अवरक्त किरणे उत्सर्जित करणे आवश्यक आहे. निवडक परावर्तन आणि उत्सर्जनात साठी काही नानोमीटर जाडीच्या एकापेक्षा अधिक थरांमध्ये धातु वापरावे लागतात. त्यामुळे त्यांचा प्रसार होण्यामध्ये अडचणी आहेत.
- या तंत्रामध्ये सूर्यप्रकाशातील अवरक्त किरणांना रोखण्यासाठी यंत्रणेत एका ठिकाणी एक लहान पट्टी ठेवणे शक्य केले आहे. त्यामुळे सूर्याच्या व त्याद्वारे येणाऱ्या किरणांच्या बदलत्या कोनासोबत या यंत्रणेमध्ये कोन बदलण्याची ही गरज राहत नाही. त्यामुळे हे नवीन तंत्र अधिक सोयीस्कर आणि परवडण्या योग्य आहे. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक फिल्म, पॉलिश केलेले ॲल्युमिनियम, पांढरा रंग आणि उष्णतारोधक असे स्वस्त घटक वापरण्यात आले आहेत.
English Summary: without any help of energy cooling technology
Published on: 14 July 2021, 11:26 IST
Published on: 14 July 2021, 11:26 IST