Farm Mechanization

अनेक शेतकरी आपल्या शेतातील कामेही ट्रॅक्टर्सच्या मदतीने पुर्ण करत असतात. फळ बागायतदार शेतकऱ्यांना तर ट्रॅक्टरची खूप गरज असते, पिकांमधील अंतरमशागतीचे कामे करण्यासाठी लहान ट्रॅक्टर्सची खूप गरज असते.

Updated on 18 July, 2020 6:57 PM IST


अनेक शेतकरी आपल्या शेतातील कामेही ट्रॅक्टर्सच्या मदतीने पुर्ण करत असतात. फळ बागायतदार शेतकऱ्यांना तर ट्रॅक्टरची खूप गरज असते, पिकांमधील अंतरमशागतीचे कामे करण्यासाठी लहान ट्रॅक्टर्सची खूप गरज असते. अशाच शेतकऱ्यांची गरज ओळखून व्हीएसटी टीलर्स अँड ट्रॅक्टर्स लिमिटेड या कंपनीने ५० हॉर्स पॉवरचा विराज ब्रँड ट्रॅक्टर नुकताच बाजारात आणला आहे.  व्हीएसटी टीलर्स अँड ट्रॅक्टर्स लिमिटेड ही भारतातील पॉवर टिलर्स आणि ट्रॅक्टर्स तयार करणारी नामांकित कंपनी आहे.  कंपनीने लॉन्च केलेले हे ट्रॅक्टर फळबागातील मशागतीसाठी फार उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान या लॉन्चिंग प्रसंगी कंपनीचे सीईओ अंटनी चारुकेरा म्हणाले की, ही कंपनी छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी पॉवर टीलर्स तयार करण्यात अग्रेसर असलेली कंपनी आहे. या कंपनीची बाजारपेठेत ५० टक्के भागीदारी आहे. ही कंपनी फळबागा, द्राक्षबागा आणि इतर सऱ्यांमधील पिकांच्या मशागतीसाठी छोटे ट्रॅक्टर तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

मोठ्या शेतकऱ्यांच्या गरजांना डोळ्यासमोर ठेवून ५० हॉर्सपॉवरचा ट्रॅक्टर तयार केला आहे. अर्थातच हे उत्पादन इतके दर्जेदार आहे की पूर्ण शक्तीनिशी दीर्घकाळपर्यंत ते शेतकऱ्यांची मदतच करेल. आगामी काळात आम्ही अशीच चांगली उत्पादने शेतकऱ्यांना देत राहू. आम्ही शेतकऱ्यांना एकाच जागी सगळ्या सेवा चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता व उत्पन्न वाढण्यास मदतच होते, असेही ते म्हणाले.

या कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष जुझार सिंह विर्क म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाची १३८ कोटी लोकसंख्या आहे. येथील ७० टक्के लोक शेती करतात. कोरोना विषाणूच्या संकटाच्या काळात शहरात काम करणारे कितीतरी जण आपल्या गावी जाऊन शेत करत आहेत. त्यामुळे काळाची गरज ओळखून आम्ही ५० हॉर्सपॉवर क्षमतेचा ट्रॅक्टर तयार केला आहे. यामध्ये ८+२ गियर सिस्टिम, १८०० किलोग्रॅम हाईड्रोलिक, आयल मेश ब्रेक, पॉवर स्टेअरिंग सारख्या  उत्तम सुविधा आहेत. शेतकऱ्यांच्या गरजा जाणून घेत आमच्या संशोधन व विकास विभागाने याला तयार केले आहे. त्यामुळे वाजवी खर्चात कमी कालावधीत शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण होतील. भारतीय शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यात या ट्रॅक्टरचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

English Summary: VST brand tractor launched by VST tillers and tractor’s
Published on: 18 July 2020, 06:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)