शेतकरी बांधवांना शेती क्षेत्रात काम करण्यासाठी, व जलद गतीनेशेतीची पूर्व मशागत पेरणी फवारणी इत्यादी कार्य करण्यासाठी आधुनिक यंत्रांची गरज भासत असते. आधुनिक यंत्रांमुळे कृषी क्षेत्रातील उत्पादन खर्च कमी करण्यास मदत झाली आहे शिवाय यामुळे घंटो का काम मिनटो मे होत असल्याने शेतीच्या कार्यात कमालीची गती प्राप्त झाली आहे. शिवाय आधुनिक यंत्राच्या वापरामुळे उत्पादनात देखील वाढ होत आहे. मात्र असे असले तरी देशात सर्वात जास्त अल्पभूधारक शेतकरी शेती करतात, तसेच दिवसेंदिवस शेतीच्या क्षेत्रात घट नमूद करण्यात येत आहे त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आधुनिक यंत्र खरेदी करणे परवडणार नाही. त्यामुळे अनेक शेतकरी भाडेतत्त्वावर आवश्यक शेती यंत्र लावत असतात आणि आपले शेतीचे कार्य पार पाडत असतात.
मात्र असे असले तरी, अनेकदा शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर यंत्र उपलब्ध होत नाही. काही वेळेस वेळेवर यंत्र उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांची कृषी संबंधित कार्य वेळेवर पूर्ण होत नाहीत त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शेतकरी मित्रांनो जर आपणही अशा समस्येपासून त्रस्त असाल तर चिंता करू नका. आता आपण केवळ एका ॲपद्वारे घरबसल्या शेतीसाठी लागणारे यंत्र भाडेतत्त्वावर बुक करू शकता. या एप्लीकेशनची सर्वात मोठी विशेषता म्हणजे जर आपल्याकडे ट्रॅक्टर रोटर टिलर अशी शेतीशी निगडित यंत्र असतील तर आपण ती यंत्रे भाडेतत्त्वावर या एप्लीकेशन द्वारे दुसऱ्या शेतकऱ्यांना देऊ शकता. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर तसेच इतर शेतीसाठी लागणारे यंत्र असतील त्यांना अतिरिक्त उत्पन्न प्राप्त होऊ शकते.
शेतकरी मित्रांनो आम्ही ज्या अँप्लिकेशनविषयी बोलत आहोत त्या अँप्लिकेशनचे “FARMS-Farm Machinery Solutions” असे नाव आहे. विशेष म्हणजे या ॲप्लिकेशनची निर्मिती भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने केली असल्याने, या अप्लिकेशनचा उपयोग पूर्णतः सुरक्षित असून, याद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता अगदी नगण्य आहे. या अॅपलिकेशन चा वापर करून ज्या शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर शेतीसाठी आवश्यक उपकरणे मिळत नसतील ते शेतकरी भाडेतत्त्वावर शेतीची उपकरणे घेऊन शेतीची कार्य करू शकतात.
शेतकरी मित्रांनो हे अँप्लिकेशन आपण प्ले स्टोअर ॲप या प्लॅटफॉर्मवरून सहजरित्या डाऊनलोड करू शकता. एप्लीकेशन आपल्या मोबाईलवर यशस्वीरीत्या इंस्टॉल झाल्यानंतर आपणास सदर एप्लीकेशन ओपन करावे लागेल, एप्लीकेशन ओपन केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला भाषा निवडण्याचा पर्याय दिसेल. भाषा निवडल्यानंतर आपणास आपला मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून एक पासवर्ड तयार करावा लागणार आहे. या पासवर्डच्या मदतीने आपण या ॲप्लिकेशन मध्ये इंटर होऊ शकता, आणि आपणास जे शेतीचे उपकरण आवश्यक आहे त्याची माहिती तपासू शकता आणि भाड्याने देखील घेऊ शकता.
शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की हे ॲप्लिकेशन भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने जवळपास बारा प्रादेशिक भाषेत उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळेहे अँप्लिकेशन वापरणे खूपच सोपे झाले आहे. एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर तसेच मोबाईल नंबर टाकून पासवर्ड तयार केल्यानंतर, आपणास आपली वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे. वैयक्तिक माहितीमध्ये आपणास आपले नाव, आपले राज्य, तहसिल, जिल्हा इत्यादी योग्यरीत्या प्रविष्ट करून आपल्या जवळ किती शेत जमीन आहे याबाबतची देखील माहिती अप्लिकेशन मध्ये भरावी लागणार आहे. एवढे केल्यानंतर आपण या ॲप्लिकेशनचा उपयोग करून शेतीची उपकरणे भाडेतत्त्वावर मागू शकता.
Published on: 20 January 2022, 10:32 IST