शेती व्यवसायात शेतकरी आता बैलांपेक्षा ट्रक्टरने जमिनीची मशागत करतो. जलदगतीने काम होत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा आता यांत्रिकरणाच्या शेतीकडे आहे. यामुळे पशुंची संख्या कमी कमी होत आहे. जर सधन शेतकरी असेल तर त्याच्याकडे ट्रक्टर असणं साहाजिकच असतं. पण ज्याप्रमाणे पशुंची आपल्याला निगा राखावी लागते त्याचप्रमाणे ट्रक्टरची देखभाल करावी लागते. परंतु गावात ट्रक्टर चालकांच्या नजरचुकीने किंवा माहिती नसल्याने विनाकारण इंधनाचा नाश होत असतो. बऱ्याचवेळा चालक ट्रक्टरचे काम नसतानाही चालू करुन इंधन वाया घालवत असतात. आज आपण अशाच काही छोट-छोट्या कल्पना जाणून घेणार आहोत ज्या आपले इंधन आणि पैसा वाचवतील.
ट्रक्टर चालवताना योग्य गिअरचा वापर
.बऱ्याच वेळा आपल्या ट्रक्टरवरील चालक हा सुशिक्षित नसतो. म्हणजे त्याला वाहनांविषयी पुरेसे ज्ञान नसते. यामुळे ट्रक्टरचे नादुरुस्त होत असते. काही वेळेला चालक मंडळी ट्रक्टर चालवताना गिअर चुकवत असतात यामुळे इंधन अधिक लागते. चुकीचा गिअर टाकल्याने ट्रक्टरमध्ये इंधनाचा खप हा २० ते ३० टक्के होत असतो. यामुळे योग्य गिअरचा वापर करणे आवश्यक असते.
डिझेलची गळती होत नसल्याची खात्री करावी
शेतकरी दररोज ट्रक्टरचा वापर करत असेल तर नेहमी कामाला जाताना ट्रक्टरची तपासणी करावी. जेणेकरून जर काही खराबी असेल किंवा डिझेलची गळती होत असेल तर त्याच्या दुरुस्ती करावी. एका सेकंदाला डिझेलचा एक थेंब खाली पडत असतो. परंतु वर्षानुसार त्याची बेरीज केली तर एका थेंबाचा आकडा हा छोटा राहत नाही, तो २ ते ३ हजार लिटरच्या घरात जात असतो. म्हणजे आपण वर्षाला ३ हजार लिटर इंधन वाया घालवत असतो. या नुकसानापासून वाचण्यासाठी इंधनाची टाकी, पंप, इंडक्टरची तपासणी नेहमी करत राहावी.
ट्रक्टरचा योग्य वापर
ट्रक्टरचा वापर योग्य पद्धतीने करत राहावे. जर आपल्याला याची माहिती नसेल तर एखाद्या जानकारी असलेल्या गृहस्थाला विचारावे. यासह आपण ट्रक्टरसह मिळणाऱ्या मॅन्युअलचा उपयोग करावा. यात ट्रक्टरची माहिती दिलेली असते. त्यानुसारच ट्रक्टरचा वापर करावा. चुकीच्या पद्धतीने ट्रक्टर चालवले तर २५ टक्के इंधन वाया जाते.
काम नसल्यास इंजिन बंद करावे
चालकाला योग्य तितकी माहिती नसल्याने ट्रक्टरमध्ये नादुरुस्ती वाढत असते. ज्यावेळी ट्रक्टरचे काम नसेल त्यावेळी चालकास ट्रक्टर बंद करण्यास सांगावे. किंवा आपण स्वत ट्रक्टर चालवत असाल आणि काम नसेल तर इंजिन बंद करावे. साधारण एक तास काम नाही ट्रक्टर फक्त उभे असेल तर इंजिन बंद केलेले चांगले असते. यामुळे इंधनची बचत होऊन आपला पैसा वाचतो.
Published on: 16 April 2020, 11:06 IST