पिकांना खते टाकण्यासाठी वापरा 'हे' देशी जुगाड यंत्र; वाचेल पैसा अन् वेळ

24 July 2020 09:10 PM

अजूनही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये  तंत्रज्ञान व यंत्रसामग्री यांचा वापर शेतीकामासाठी केला जात नाही.   जर शेतकऱ्याकडे कमी जमीन असेल तर शेतकरी आपल्या कुटुंबासह शेतात राबताना दिसतो.   जमीन छोटी असल्याने यंत्र आणणे आणि यंत्र भांडाने घेणे ही त्या शेतकऱ्यांना परवडत नाही. पण

ज्याच्याकडे जास्त जमीन आहे असे शेतकरी बहुतांशी  मजुरांवर अवलंबून असतात.  मजुरांवर अवलंबून राहिल्याने शेती उत्पादनाचा खर्च हा  वाढतो.  छोट्या शेतकऱ्यांना किंवा दोन किंवा चार एकर असलेल्या शेतकऱ्यांनाही महागडे यंत्र व तंत्रज्ञानचा वापर करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.  म्हणून आता बर्‍याचशा प्रमाणात शेतकरी देशी जुगाड लावून स्वस्तात शेतीत वापरण्याजोगे घरगुती उपकरणे बनवतात. या साधनांमुळे अधिकची मेहनतही त्यांची कमी होत असते.

आज आपण रासायनिक खते पिकांना टाकण्यासाठीचे देशी जुगाड लावून तयार केलेली यंत्र पाहू.  हे यंत्र जास्तीत जास्त शंभर ते दोनशे रुपयांमध्ये तयार होते.  त्यासाठी आपल्याला लागतो एक किंवा दीड इंचाचा व तीन  चार फुटाचा पीव्हीसी पाईप  आपण ठिंबकच्या फिल्टरला वापरतो तो छोटा पाण्याचा व्हॉल व एक आपण 5 लिटर तेलाचा रिकामा ड्रम. इतकेच साधन या यंत्रासाठी लागते. 

 


तयार करताना आपण तो प्लास्टिकचा ड्रम मागच्या बाजूने कापून टाकावा व त्यांच्या पुढील बाजूच्या छोट्या तोंडात प्लास्टिकचा पाइप व्यवस्थित बसवावा. त्या पाईपमध्ये पाण्याचा व्हॉल्व बसवावा.  बस एवढ्याच साहित्य यंत्र तयार करण्यास पुरे आहे.  जेव्हा आपण पिकांना रासायनिक खते देतो तेव्हा खत ड्रमच्या कापलेल्या भागाकडून ड्रममध्ये भरावे व पाइपला बसवलेला वाल चालू करून आपल्याला हवे त्या प्रमाणात खते देता येते.  साधारणतः हा एक किंवा दोन एकरला खत देण्यासाठी दोन किंवा तीन मजुरांची आवश्यकता पडते.  पण या यंत्राद्वारे एक व्यक्ती दोन एकरला खत देऊ शकतो.  त्यामुळे आपल्याला लागणाऱ्या मजुरांमध्ये ही बचत होते पर्यायी आणि आपल्याला खर्च कमी लागतो.

indigenous jugaad machine jugaad machine fertilize crops देशी जुगाड जुगाड यंत्र देशी जुगाड यंत्र
English Summary: Use this indigenous jugaad machine to fertilize crops, save money and time

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.