Farm Mechanization

सध्या शेती आणि यांत्रिकीकरण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शेतीमध्ये शेतकरी आता मोठ्या प्रमाणात यंत्रांचा वापर करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाचतो आणि वेळेतही बचत होते.

Updated on 08 September, 2021 3:43 PM IST

 सध्या शेती आणि यांत्रिकीकरण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शेतीमध्ये शेतकरी आता मोठ्या प्रमाणात यंत्रांचा वापर करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाचतो आणि वेळेतही बचत होते.

.शेतीमध्ये उपयोगी येण्यासाठी विविध संस्थांद्वारे, कृषी विद्यापीठे यांच्या द्वारा विविध  यंत्र विकसित केले जातात.शेतीची आंतरमशागत, पूर्वमशागत इत्यादी साठी लागणारे बरेच यंत्र विकसित करण्यात आले आहेत. ज्ञानेश्वर मध्ये अशाच शेती उपयोगी यंत्रांच्या बद्दल आपण माहिती घेणार आहोत.

 शेती उपयोगी यंत्र

 ब्रूम स्प्रेयर– हे यंत्र ट्रॅक्‍टरच्या पी टी ओ  साहाय्याने चालते.हे फवारणी यंत्र असून या यंत्राच्या साह्याने आपल्याला हवे तेवढे द्रावण प्रति हेक्‍टरी फवारणी करू शकतो. या यंत्राला 400 लिटर द्रावण क्षमतेची टाकी बसवलेली असते. डायन्द्रा च्या साह्याने हवे त्या दाबाने व पाहिजे तेवढ्या द्रावणाची फवारणी करता येते.

  • यासाठी या यंत्रात बूम स्प्रेयर वर कंट्रोल बसवलेले असते. एचडीपी पंपाच्या साहाय्याने योग्य त्या दाबाने पाचशे ते हजार मायक्रोमिटर आकाराचे थेंब तयार होतात. या फवारणी यंत्राच्या साह्याने दहा ते पंधरा हेक्टर क्षेत्रावर एका दिवसात फवारणी करता येते.
  • ट्रॅक्‍टरचलित हवा दबाव आधारित टोकन यंत्र – एक पेरणी यंत्र असून या यंत्रामुळे दोन ओळीतील अंतर, बियाण्याची खोली व रोपातील अंतर अचूकपणे साधता  येते. केंद्र भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेने विकसित केले आहे. यंत्र 35 ते 45 अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्‍टरला जोडता येते. तसेच या यंत्राची कार्यक्षमता ही 0.5 ते 1.0 प्रति तास आहे.या यंत्राने ज्वारी, सोयाबीन, कापूस, तुर इत्यादी पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते.
  • रुंद वरंबा आणि सरी यंत्र – बियाण्याचे असमान वाटप, कुशल मजुरांची टंचाई आणि कमी कार्यक्षमता याचा विचार करून रुंद वरंबा व सरी यंत्र विकसित करण्यात आले आहे. हे यंत्र सोयाबीन, मका,भुईमूग, हरभरा,ज्वारी, बाजरी,उडीत, मूक इत्यादी पिकांच्या टोकण पद्धतीने पेरणी करण्यासाठी उपयुक्त आहे. या यंत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची पेरणी करण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या तबकड्या असून त्या सहज बदलता येतात तसेच प्रत्येक मुलीसाठी फण असल्यामुळे पानातील अंतर आवश्यकतेनुसार बदलता येते. या यंत्राच्या साह्याने फाटलेल्या सऱ्यामुळे कमी पाऊस पडल्यास जल संवर्धन होते. तसेच जास्त पाऊस पडला तर अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो.
  • ट्रॅक्‍टरचलित कोळपे – ट्रॅक्‍टरचलित कोळप्यायलाव्हीआकाराचे पातेअसून एकाच वेळी तीन ते पाच ओळीतील गवत काढले जाते.
  • एका दिवसात सहा ते सातहेक्टर  क्षेत्र पूर्ण करता येते. ट्रॅक्टरचे पेरणी केलेले शब्दासाठी हे यंत्र उपयुक्त आहे तसेच पिकांच्या ओळी सरळ असल्यामुळे आंतर मशागत पूर्ण  होऊन पिकांची हानी कमी होते.
  • तव्यांचा कुळव –नांगरणी  नंतर तयार होणारी मोठी ढेकळे फोडून जमीन पेरणी योग्य करण्यासाठी तव्यांचा कुळव याचा उपयोग होतो. तव्याचा व्यास 40 ते 60 सेंटिमीटर असून ते 15 ते 20 सेंटीमीटर अंतरावर लावलेले असतात.

 

English Summary: use of this small machine in farming less productivity cost
Published on: 08 September 2021, 03:43 IST