Farm Mechanization

आपण बऱ्याच वेळा पाहतो की फळबागांमध्ये कमी-अधिक प्रमाणात यांत्रिकीकरणामुळे जमीन दबली जाते. या जमीन दबल्यामुळे मातीची रचना बिघडते. जमीन कडक होते व फळबागेतील जमीन सुधारण्यासाठी वाइब्रेटिंग सबसॉयलरचा वापर फायदेशीर ठरतो. त्या लेखात आपण सबसॉयलर चीझल नांगर या यंत्राविषयी माहिती घेऊ.

Updated on 19 July, 2021 11:41 AM IST

 आपण बऱ्याच वेळा पाहतो की फळबागांमध्ये कमी-अधिक प्रमाणात यांत्रिकीकरणामुळे जमीन दबली जाते. या जमीन दबल्यामुळे मातीची रचना बिघडते. जमीन कडक होते व फळबागेतील जमीन सुधारण्यासाठी वाइब्रेटिंग सबसॉयलरचा वापर फायदेशीर ठरतो. त्या लेखात आपण सबसॉयलर चीझल नांगर या यंत्राविषयी माहिती घेऊ.

  • सबसॉयलर:
  • सबसॉयलर हा जमीनीच्या पृष्ठभागाखाली दीड ते दोन फूट चालतो. याचा तळी फोडणारा टोकदार फळ एक फूट लांबीचा असतो. जमिनीत जाणारी मांडी ही अडीच फुटाची असते. पृष्ठभागाखाली तयार झालेला घट्ट थर फोडण्यासाठी सबसॉयलरचा वापर आवश्यक आहे.
  • हलक्‍या व कमी खोलीच्या जमिनीत दीड फूट खोलीपर्यंत सबसॉयलर चालवावा. भारी, खोल जमिनीत दीड ते दोन फूट खोलीपर्यंत  सबसॉयलर चालतो. नांगरटी पूर्वी पाच फूट अंतरावर सबसॉयलर चालवावा. सबसॉयलर ने ट्रॅक्टरच्या शक्तीनुसार दीड ते दोन फूट खोलीपर्यंत नांगरट करून जमीन मोकळी केली जाते.
  • जमिनीच्या पृष्ठभागाखाली घट्ट थर फोडला जातो, त्यामुळे जमिनीत हवा भरून माती मोकळी होऊन जमीन भुसभुशीत होते. जमिनीस वाफसा लवकर येऊन हवा खेळती राहते, त्यामुळे जमिनीची मशागत चांगली खोलवर करता येते.
  •  सबसॉयलर मुळे जमिनीतील जास्तीचे पाणी व क्षार यांचा निचरा होतो. जमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक सुपीकता वाढविण्यास मदत होते. पिकाची मुळांची वाढ चांगली होऊन पीक लोळण्याचे प्रमाण कमी होते.

  • सबसॉयलर चालवण्यासाठी डिसेंबर ते एप्रिल महिन्याचा कालावधी चांगला असतो. जमिनी मध्ये असणारी पाण्याची पाईपलाईन, विजय ची वायर असणाऱ्या ठिकाणी अगोदर मार्किंग करून घ्यावी व ते तुटणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • सबसॉयलरचा वापर खोडव्यामध्ये करताना खोडकी, जमिनीलगत छाटलेली असावी. सबसॉयलर दोन ते तीन वर्षातून एकदा वापरावं.
  • सबसॉयलरचा वापर केलेली जमीन आठ ते पंधरा दिवस पुन्हा मध्ये तापवून त्यानंतरच पुढील मशागत करावी

     व्हायब्रेटिंग सबसॉयलर

  • द्राक्ष बाग, अन्या फळबागा यामध्ये कमी-अधिक प्रमाणात यांत्रिकीकरणामुळे जमीन दबली जाते. मातीची रचना खराब होते. पाण्याचा निचरा होण्यास अडथळे येतात. या अडचणी लक्षात घेऊन फळबागेतील जमीन सुधारण्यासाठी वाइब्रेटिंग सबसॉयलरचा वापर करावा. याच्या वापराने जमिनीतील घट्ट झालेला मातीचा थर फोडला जातो व जमीन मोकळी होते.
  • जमिनीतील पाणी व खनिजे वनस्पतीच्या मुळाच्या खोलीत आणि पावसाचे पाणी आणि सिंचनाचे पाणी जमिनीत चांगली मुरते. त्याचा पीक वाढीस फायदा होतो. याच्या वापराने जमिनीत ओलावा टिकून राहतो.
  • हे यंत्र चालविण्यास सोपे आहे व कमी अश्वशक्ती लागते.

चीझल नांगर

  • मर्यादित खोलीवर नांगरटी साठी हा नांगर उपयुक्त आहे. याच्या वापराने घट्ट झालेली जमीन मोकळी केली जाते.
  • नांगराचा वापर करताना जमिनीवर फारसा दाब येत नाही. जमिनीतील कठीण थर लगेच मोकळा  केला जातो.
  • हा नांगर जमिनीत 15 सेंटिमीटर ते 40 सेंटीमीटर खोलीपर्यंत चालतो
    • वैभव सुर्यवंशी,9730696554

 विषय विशेषज्ञ ( कृषी शक्ती व अवजारे अभियांत्रिकी ) कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव)

English Summary: use of the subsoiler and chizel plough in farm
Published on: 19 July 2021, 11:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)