भारतात कृषी क्षेत्राला अधिक महत्व आहे. बळीराजाला अधिक त्रास होऊ नये. शेतकऱ्याचे जीवनमान उंचावावे यासाठी सरकार वेगवेगळ्या योजनाही आणत असते. शेतकऱ्यांना अवजारांची सुविधा व्हावी यासाठी सरकारने अनेक ठिकाणी हायरिंग सेंटरही चालू केली आहेत. यामुळे शेतकरी आता आधुनिकतेकडून वळला असून आता शेतात यांत्रिकरणाचा वापर अधिक करत आहे. पेरणीपासून ते कापणी पर्यंत सर्व कामे आता यंत्राने होत आहेत. यंत्राचा वापर केल्यामुळे शेतीची काम जलद गती होतात शिवाय मजुरासाठी लागणारा पैसा हा कमी लागतो, शेतात उपयोगात येणाऱ्या अशाच काही अवजारांची माहिती आम्ही आज तुम्हाला देत आहोत.
झिरो टिलेज - या यंत्राच्या साहाय्याने आपण गहू आणि इतर पीकांची पेरणी करु शकतो. या मशीनला घेण्यासाठी खर्चही कमी येत असतो.
ट्रॅक्टर चलित डिस्क हॅरो - याचा उपयोग हा बाग आणि झाडांमध्ये मशागत करताना होत असतो. यामुळे मशागतीसाठी लागणार खर्च हा ४० टक्क्यांनी कमी होतो.
रोटावेटर -
या कृषी यंत्राने कोरडी व ओलसर जमीन तयार केली जाते. या यंत्राच्या साहाय्याने हिरवी खते आणि पेंढा शेतीच्या मातीत चांगले मिसळले जाते. अशा प्रकारे माती ठिसूळ होत असते. यामुळे शेतीतील मशागतीवरील खर्च हा ६० टक्क्यांनी कमी होत असतो. आणि पिकाचे उत्पन्न वाढते.
भात ड्रम सीडर
या यंत्राच्या सहाय्याने धान्याच्या शेतात आधीच साठवलेले बियाणे तयार करुन त्याला शेतात पेरले जाते. हे कमीतकमी 20 टक्के बियाणे वाचवते. अशा प्रकारे पिकाची पेरणी चांगली केली जाते, ज्यामुळे पिकाचे उत्पादन व गुणवत्ता वाढते.
Published on: 22 April 2020, 04:41 IST