Farm Mechanization

कृषी क्षेत्रामध्ये आता यांत्रिकीकरण खूप मोठ्या प्रमाणावर होऊ लागले असून शेतीची बरीच कामे आता यंत्रांच्या साह्याने केली जातात. जर आपण कृषी क्षेत्रामधील यंत्रांचा वापराचा विचार केला तर अगदी शेताची तयारी तर पीक लागवड आणि पिकांचे काढणीपर्यंतची कामे ही यंत्रांच्या साहाय्याने आता करता येणे शक्य आहे.

Updated on 09 October, 2022 10:31 AM IST

कृषी क्षेत्रामध्ये आता यांत्रिकीकरण खूप मोठ्या प्रमाणावर होऊ लागले असून शेतीची बरीच कामे आता यंत्रांच्या साह्याने केली जातात. जर आपण कृषी क्षेत्रामधील यंत्रांचा वापराचा विचार केला तर अगदी शेताची तयारी तर पीक लागवड आणि पिकांचे काढणीपर्यंतची कामे ही यंत्रांच्या साहाय्याने आता करता येणे शक्य आहे.

नक्की वाचा:Machinary: भावांनो! 'या' यंत्राचा वापर करा आणि पीक काढणीसाठी लागणाऱ्या खर्चात करा बचत, वाचा डिटेल्स

परंतु या यंत्रांच्यामध्ये ट्रॅक्टर शेतीमध्ये जास्त प्रमाणात वापरले जाते. अगदी लागवडीसाठी जमीन तयार करणे असो की शेतीमधील मालाची ने आण इत्यादी कामांसाठी ट्रॅक्‍टरचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.

तसेच फळबागांमध्ये बागेतील आंतरमशागतीसाठी ट्रॅक्‍टरचा वापर केला जातो. परंतु खास करून यासाठी छोट्या ट्रॅक्टर अर्थात मिनी ट्रॅक्टरचा वापर फायद्याचा ठरतो. त्यामुळे या लेखात आपण शेतकरी बंधूंना शेतीच्या कामासाठी फायद्याचे ठरतील अशा दोन ट्रॅक्टरबद्दल उपयुक्त माहिती घेऊ.

 शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील असे दोन मिनी ट्रॅक्टर

1- फार्मट्रेक ATOM 26- जर आपण या ट्रॅक्टरचा विचार केला तर हे शेती आणि फळ बागातील कामांसाठी अतिशय फायदेशीर आहे. हे ट्रॅक्टर तीन सिलेंडर आणि 26 हॉर्स पावर इंजिनने समर्थित आहे. तसेच यामध्ये कॉन्स्टंट मॅक्स गिअर बॉक्स आहे. यामध्ये पुढील नऊ गिअर्स आणि रिव्हर्स तीन गिअर्स मध्ये देण्यात आलेले आहेत.

नक्की वाचा:शेतीकामासाठी सर्वोत्तम भारतातील टॉप 5 ट्रॅक्टर; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

तसेच या ट्रॅक्टरला ऑइल इमरस्ड डिस्क ब्रेक्स बसवले जाते. तसेच तिची वजन उचलण्याची क्षमता 750 किलोपर्यंत आहे. ट्रॅक्टरची किंमत चार लाख ऐंशी हजार ते पाच लाख रुपयांपर्यंत आहे.

2- सोनालीका जीटी 20 आरक्स- या ट्रॅक्टर मध्ये तीन सिलेंडर आणि 20 हॉर्सपॉवर क्षमतेची इंजन आहे. या ट्रॅक्टरमध्ये यांत्रिक स्लाइडिंग मॅश गिअर बॉक्स देण्यात आला असून यामध्ये सहा गिअर्स फॉरवर्ड आणि दोन गिअर्स बॅकवर्ड मध्ये आहेत.

या ट्रॅक्टरची फ्युएल टॅंक 32 लिटरची असून याची वजन उचलण्याची क्षमता 650 किलोपर्यंत आहे. या ट्रॅक्‍टरची किंमत तीन लाख 30 हजार रुपये तीन लाख 60 हजार रुपयांपर्यंत आहे.

नक्की वाचा:Tractor News: शेतकऱ्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परफेक्ट आहे 'हे'ट्रॅक्टर, वाचा वैशिष्ट्ये

English Summary: trhis is two mini tractor is so benificial for farmer for farming work
Published on: 09 October 2022, 10:31 IST