शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर यंत्रांचा वापर होऊ लागला आहे. परंतु या सर्व यंत्रांमध्ये ट्रॅक्टर या यंत्राचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेताची पूर्व मशागत तसेच अंतर मशागतीचे कामे, पिक काढणी आणि काढणीपश्चात बाजारपेठेत शेतीमाल पोहोचवण्याकरिता देखील ट्रॅक्टरचा वापर होतो.
तसेच ट्रॅक्टरमध्ये छोटे अर्थात मिनी ट्रॅक्टर देखील असून हे ट्रॅक्टर देखील शेतीच्या सर्व कामांमध्ये मोठ्या ट्रॅक्टरच्या बरोबरीने काम करण्यास सक्षम असतात. मिनी ट्रॅक्टर प्रामुख्याने फळबागांमध्ये आंतरमशागतीच्या कामांकरिता वापरले जातात. भारतामध्ये अनेक कंपन्यांचे मिनी ट्रॅक्टर उपलब्ध आहेत.
अगदी त्याच पद्धतीने ज्या शेतकऱ्यांना मोठे ट्रॅक्टर घेणे परवडण्यासारखे नाही असे शेतकरी बंधू छोटा ट्रॅक्टर अर्थात मिनी ट्रॅक्टर घेऊ शकतात. कमीत कमी किमतीत चांगले काम करू शकेल असे मिनी ट्रॅक्टरचा शोधात बरेच शेतकरी असतात. शेतकऱ्यांची गरज ओळखून ट्रॅक्टर निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी स्वराज्यने स्वराज कोड मिनी ट्रॅक्टर या नावाचा ट्रॅक्टर बनवला असून हे आकाराने खूपच लहान आहे.
स्वराज कंपनीचा स्वराज कोड मिनी ट्रॅक्टर
कमीत कमी खर्चात शेतीची कामे चांगल्या पद्धतीने करू शकेल असा ट्रॅक्टर स्वराज कंपनीने तयार केला आहे व या ट्रॅक्टरचे नाव आहे स्वराज कोड मिनी ट्रॅक्टर हे होय. हा ट्रॅक्टर आकाराने खूप लहान असून शेतातील अनेक प्रकारचे कामे वेगाने करण्यासाठी सक्षम आहे.
या ट्रॅक्टरचे इंजिन हे 399cc क्षमतेचे असून एक सिलेंडर इंजिन आहे. अकरा हॉर्स पावर निर्माण करण्याची क्षमता या ट्रॅक्टरच्या इंजिनमध्ये असून ट्रॅक्टरमध्ये दहा लिटरची फ्युएल टॅंक म्हणजेच इंधन टाकी आहे. 455 किलो वजन असलेले या ट्रॅक्टरची हायड्रोलिक अर्थात वजन उचलण्याची क्षमता 220 किलो ची आहे. तीन फॉरवर्ड आणि तीन रिव्हर्स असे सहा गिअर्स या ट्रॅक्टरला देण्यात आले असून यामध्ये दोन व्हील ड्राईव्ह देण्यात आला आहे.
स्वराज ट्रॅक्टरच्या या मॉडेलचे नाव स्वराज कोड 2WD आहे. हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्टीने त्यांना परवडेल हा दृष्टिकोन समोर ठेवून तयार करण्यात आला आहे. या वैशिष्ट्ये याशिवाय या ट्रॅक्टरवर एक वर्षाची वारंटी सुद्धा आहे. त्यामुळे जर शेतकऱ्यांना हा ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर योग्य माहिती घेऊनच पुढील खरेदीचा विचार करावा.
किती आहे या ट्रॅक्टरचे किंमत?
स्वराज कंपनीने तयार केलेल्या या ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत दोन लाख 45 हजार ते दोन हजार पन्नास हजार इतकी आहे.
Published on: 14 August 2023, 04:01 IST