डोंगराळ भागातील लोकांचे स्थलांतर होण्याचे प्रमुख कारण म्हणजे बेरोजगारी आहे. डोंगराळ भागातील लोक रोजगाराच्या शोधात शहरांकडे स्थलांतरित होत आहेत.
परंतु शेतीमध्ये उत्तम उपकरणे वापरून कृषी क्षेत्र सुधारता येते. यामुळे डोंगराळ भागात देखील रोजगाराच्या संधी वाढू शकतात. डोंगराळ भागात शेतीसाठी कोणतीही कृषी यंत्र वापरले जाऊ शकतात ज्यामुळे जमीनसुधारणा चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते.या लेखामध्ये आपण अशा डोंगराळ भागांमध्ये उपयुक्त ठरतील अशा यंत्रांची माहिती घेऊ.
उंचसखल आणि डोंगराळ भागात उपयुक्त शेती यंत्रे
1- पावर टिलर-पावर टिलर वापरून शेती अगदी सहज करता येते.जेथे पावर टिलर डोंगराळ भागातील शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे.
लहान पॉवर टिलरमुळे ते डोंगर शेतात सहजपणे हलवता येते. यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट वाचतात व त्यांना मदत होते. हे प्रामुख्याने पेरणीसाठी वापरले जाते. त्याची किंमत थोडी जास्त आहे मात्र आता सरकार शेतकऱ्यांना शेती उपकरणे करण्यासाठी अनुदानही देत आहे.
नक्की वाचा:फ्लिपकार्टचा ‘धमाल सेल’ ‘या’ वस्तूंवर मिळणार जबरदस्त डिस्काऊंट!
2-प्राणीचलित प्रगत रिबन - या उपकरणाचा वापर करून तन्य शक्ती कमी करण्यासाठी पारंपारिक सरड ब्लेडच्या जागी सुधारित व्ही ब्लेडवापरला जाते.
हे ब्लेड माती चांगल्या पद्धतीने मोकळी करते आणि त्याच्या मागे ठेवलेला रोल मातीचे ढेकुळ फोडण्यास मदत करतो व त्यामुळे माती भुसभुशीत होते व जमीन सपाट करतो. त्यामुळे मातीची आद्र्रता टिकून राहते. या मशिनची किंमत अंदाजे चार हजार रुपये आहे
नक्की वाचा:लाखो रुपयांच्या कांद्यात सोडल्या शेळ्या; भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत
3- पावर टिलर चलित खुरपणी यंत्र-हे यंत्र आठ ते दहा एचपी आकाराच्या पावर टिलर साठी डिझाईन केले आहे. या माध्यमातूनयंत्र विस्तीर्ण अंतरावरील पिकांच्या तणाचा आणि देठांचा नायनाट करते. या उपकरणामध्ये स्विप प्रकारचा ब्लेड,मुख्य फ्रेम, हँडल, स्टिअरिंग व्हील पुल सिस्टम समाविष्ट आहे.
याची किंमत अंदाजे आठ हजार रुपये आहे.
4- स्ट्रा रिपर - शेतातीलयाच्या शेंगा, बटाटे काढण्याकरिता कष्टाच्या कामांसाठी याचा वापर करता येतो. यामध्ये सीड्स फ्रेम्स, हँडल, स्टेरिंग व्हील, डेप्त ॲडजस्टमेंट सिस्टम आणि व्ही ब्लेड यांचा समावेश होतो.या यंत्राच्या मदतीने आपण मातीतून भाजीपाला सहज काढू शकतो त्यामुळे श्रम आणि वेळ दोन्ही वाचतात.
नक्की वाचा:नक्की वाचा:हम भी किसी से कम नहीं; नंदूरबारच्या वन मॅन आर्मी महिला शेतकऱ्याची लाखोंची कमाई
Published on: 02 June 2022, 09:54 IST