Farm Mechanization

शेतीमध्ये सध्या विविध कामांमध्ये यांत्रिकीकरणाची वारे वाहू लागले आहेत. शेतीत येऊ घातलेल्या यांत्रिकीकरणामुळे शेतीचे कामे वेळच्या वेळी होऊन उत्पादनामध्ये वाढ होते. शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन येण्यासाठी जे कमाल गरजा आहेत

Updated on 08 January, 2022 2:30 PM IST

शेतीमध्ये सध्या विविध कामांमध्ये यांत्रिकीकरणाची वारे वाहू लागले आहेत. शेतीत येऊ घातलेल्या यांत्रिकीकरणामुळे शेतीचे कामे वेळच्या वेळी होऊन उत्पादनामध्ये वाढ होते. शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन येण्यासाठी जे कमाल गरजा आहेत

त्या म्हणजे पेरणीपूर्व शेतीची मशागत, वेळेवर पेरणी आणि बियांची योग्य खोलीवर पेरणी, पाणी कीटकनाशक आणि खत व्यवस्थापन, पीक काढणी व मळणी मध्ये कमीत कमी नासधूस आणि वेळेत शेतीची कामे पूर्ण करणे यासारखे उद्देश साध्य करण्यात यांत्रिकीकरणाचा फार मोठा वाटा आहे. यासाठी योग्य सुधारित शेती अवजारे वापरणे गरजेचे आहे. या लेखामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली काही सुधारित कृषी अवजारे व त्यांचा वापर यांची माहिती घेऊ.

 महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेली शेती उपयोगी काही यंत्रे….         

  • फुलेहायड्रो- मेकॅनिकली नियंत्रित ऑफसेट फळबागा व्यवस्थापन यंत्र- महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ट्रॅक्‍टरचलित फुले हायड्रो मेकॅनिकली नियंत्रित ऑफसेट फळबाग व्यवस्थापन यंत्राची फळबागेतील जारवा तोडणे तसेचवरंबा फोडण्याकरता शिफारस करण्यात आली आहे.
  • विद्युत मोटर चलीत फुले ऊस बेणे तोडणी यंत्र- महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विद्युत मोटर चलीत फुले ऊस बेणे तोडणी यंत्राची ऊस रोपवाटिकेसाठी ऊस बेणे तयार करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. हे यंत्र एक अश्वशक्ती व सिंगल फेज विद्युत मोटार वर चालते. तसेच एका तासात 65 ऊस बेणे तयार होतात. जुलैमध्ये 85 ते 95 टक्के बचत होते तसेच खर्चामध्ये देखील 80 ते 85 टक्के बचत होते.
  • मनुष्य चलित फुले शेवगा काढणी झेला- महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या मनुष्यचलीत फुले शेवगा काढणी झेल्याची शिफारस करण्यात आली आहे. याच्या साह्याने एका तासामध्ये दोनशे पन्नास ते 280 शेंगा काढता येतात तसेच शेंगा काढताना शेंगांना कुठल्याही प्रकारची इजा होत नाही.
  • ट्रॅक्‍टरचलित फुले ऊस रोपे पुनर्लागवड यंत्र- महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ट्रॅक्‍टरचलित फुले उस रोपे पुनर्लागवड यंत्राची ऊस रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. हे यंत्र 45 अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते. एकशे वीस सेंटीमीटर ते दीडशे सेंटीमीटर दोन ओळीतील अंतर असेल तर अशा ठिकाणी ऊस रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी उपयुक्त आहे एका दिवसामध्ये अडीच ते तीन एकर क्षेत्रावर ऊस रोपांची पुनर्लागवड करता येणे शक्य आहे.
English Summary: this machinary useful for farming develope by mahatma phule krishi vidypith
Published on: 08 January 2022, 02:30 IST