Farm Mechanization

शेतीमध्ये सध्या आधुनिकतेचे वारे वाहत आहेत. शेतकरी आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध प्रकारच्या यंत्राचा वापर करून शेतीची कामे सुसह्य बनवत आहे. शेतीमध्ये यंत्राचा वापर केला तर वेळेची आणि पैशाची बचत तर होतेच परंतु उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होते. या लेखामध्ये आपण भातशेतीसाठी लागणारी काही आवश्यक यंत्रांच्या बाबतीत जाणून घेणार आहोत.

Updated on 03 March, 2022 7:42 PM IST

शेतीमध्ये सध्या आधुनिकतेचे वारे वाहत आहेत. शेतकरी आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध प्रकारच्या यंत्राचा वापर करून शेतीची कामे सुसह्य बनवत आहे. शेतीमध्ये यंत्राचा वापर केला तर वेळेची आणि पैशाची बचत तर होतेच परंतु उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होते. या लेखामध्ये आपण भातशेतीसाठी लागणारी काही आवश्यक यंत्रांच्या बाबतीत जाणून घेणार आहोत.

  • स्वयंचलित भात कापणी यंत्र :- या यंत्रामध्ये भात कापण्यासाठी कट्टर बसवले असून स्टार विल आणि बेल्ट मुळे थापली चालू असताना पीक एका बाजूला टाकले जाते. कापले जाणारे पीक एका ओळीत पडत असल्याने बांधणीचे काम सोपे होते. यंत्राचा इंजिनचा विचार केला तर या यंत्रावर 3.5 अश्वशक्ती चे पेट्रोल इंजिन असून हे इंजिन यंत्राला व त्यातील चाकाला गिअरबॉक्स द्वारे शक्ती संक्रमण होते या यंत्राचे वजन 2025किलो असून त्याच्या कट्टर बारची रुंदी 1.2 मीटर असते. यंत्र भाताची कापणी करीत असताना अकरा सेंटीमीटर उंची पासून करते. जर जमीन ओली असेल तर यंत्राला चालने सुलभ व्हावे यासाठी केज विल बसवता येतात. या यंत्राच्या ताशी वेग अडीच किमी आहे. जर पेट्रोल लागत चा विचार केला तर प्रति तास एक लिटर पेट्रोल लागते.

 स्वयंचलित भात लागवड यंत्र :- सकाळी पद्धतीने तयार केलेल्या एका दिवसाच्या भात रोपांची लागवडया यंत्राद्वारे कमी वेळात करता येते.लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ एक टक्का क्षेत्र चटई रोपवाटिकेसाठी पुरेसे असते. जर 1 एकर क्षेत्राचा विचार केला तर दहा मीटर बाय एक मीटर आकाराचे तीन गादीवाफे जर  केले तर एवढे रोप एक एकर क्षेत्राला पुरते.

  • रोपवाटिकेमध्ये दहा बाय एक मीटर च्या गादीवाफे साठी पाच किलो बियाणे लागते. तसेच रोपवाटिकेसाठी लागणारी माती दोन मि मी च्या चाळणीमधून चाळून घ्यावे. या यंत्राचा वापर करताना कमीखोला ची  चिखलणी करून शेतातील मातीच्या प्रकारानुसार चिखल बसू देणे आवश्यक असते तसेच भात खाचरात तीन ते चार सेंटीमीटर खोल पाणी असणे आवश्यक असते. या यांच्यावर यंत्र चालवणार्‍या साठी बसायला जागा आहे.

 चटाई रोपवाटिकेमध्ये आवश्यक आकाराचे काप करूनयंत्राच्या ट्रेमध्ये  ठेवता येतात. शेतात पेरणी करत असताना एका चुडात भाताचे तीन ते चार रोपांचे आठ ओळीत 14 ते 17 सेंटिमीटर अंतर लागवड करता येते. या यंत्राच्या इंजिनचा विचार केला तर साडेचार अश्वशक्ति चे डिझेल इंजिन आहे. व एक लिटर दिसेल प्रति तास लागते. या यंत्राच्या मदतीने केवळ दोन  ते चार मजुरांद्वारे दिवसभरात अडीच ते चार क्षेत्र एकरावर लागवड केली जाते.

3)कोनोविडर:- या यंत्राच्या मदतीने भात पिकातील दोन ओळींतील तण काढून चिखलात गाडले जाते.या यंत्राचे वजन 5.6 किलो ग्रॅम असून त्याची रुंदी 130 मी मी आहे.

हे यंत्र वापरायला अत्यंत सोपे असून हैदरा वापरताना खाचरामध्ये पाच ते सहा मी पाण्याची पातळी असणे आवश्यक असते. या यंत्राची काम करण्याची कार्यक्षमता पाहता एका तासात सात ते दहा गुंठे शेतामधील तण काढले जाते.आणि कार्यक्षमतेचा विचार केला तर या यंत्राची कार्यक्षमता 64.5 टक्के वतन काढण्याची क्षमता 80 टक्के आहे. या यंत्राच्या वापराने जवळ-जवळ 50 ते 60 टक्के वेळ आणि खर्चात बचत होते.

English Summary: this is useful machinary for paddy crop and farming for more profit
Published on: 03 March 2022, 07:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)