आपल्याला माहिती आहेच की शेतकरी कुटुंबातील घरातील कुटुंब प्रमुखच नाहीतर घरातील सगळेच व्यक्ती एकत्र शेतामध्ये काबाडकष्ट करीत असतात. यामध्ये महिलांचा सहभाग देखील फार मोठा असतो. परंतु यामध्ये जर खरी ओढातान होत असेल तर ती महिलावर्गाची. कारण सकाळी घराच्या कामं पासून तर लगेच शेतामध्ये जाऊन दिवसभर काम करून परत घरातील काम या चक्रामध्ये प्रचंड प्रमाणात थकवा जाणवतो. परंतु या लेखामध्ये आपण अशा काही यंत्रांची माहिती घेणार आहोत, यांच्या वापरामुळे महिला वर्गाचे शेतातील कष्ट बऱ्याच प्रमाणात वाचतील व त्यांचे काम देखील सोपे होईल.
महिलांसाठी उपयुक्त कृषी यंत्र
1- नवीन डीब्लर व पीएयू सीडड्रिल- हे यंत्र लागवडीसाठी वापरण्यात येते. या यंत्राच्या साहाय्याने गहू, सोयाबीन, मका, हरभरा इत्यादी आकाराने मोठ्या असलेल्या बियाण्यांची एका रांगेत लागवड करणे सोपे जाते. या यंत्राचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या यंत्राच्या साह्याने काम करताना वाकून काम करायची गरज नाही.
त्यामुळे महिला वर्गांना कामात येणारा थकवा जाणवत नाही व वेळेत देखील भरपूर बचत होते. तसेच या यंत्रांच्या साहाय्याने एका रांगेत लागवड होत असल्याकारणाने गवत काढण्यासाठी जी काही यंत्रे वापरतो त्यांचा वापर करता येतो.या नवीन डिबलर मशीन ची किंमत 700 रुपये आहे आणि सी ड्रिल मशीन ची किंमत पाचशे रुपये आहे.
2- तण काढण्यासाठी उपयोगी यंत्र- महिला शेतामध्ये तणनियंत्रणासाठी सिंगल व्हील हो विडर मशीन आणि ट्वीन व्हील हो आणि कॉनो विडर या यंत्रांचा वापर महिला करू शकतात. या यंत्रांचा वापर करताना जमिनीवर बसून काम करण्याची आवश्यकता नसून आरामात उभे राहून काम करता येऊ शकते. या यंत्राची किंमत सहाशे ते आठशे रुपयांच्या दरम्यान आहे.
3- शेतामध्ये सरी आणि बेड बनवण्यासाठी उपयोगी यंत्र- पिकांना पाण्याचा पुरवठा करता यावा यासाठी आपण सऱ्या पाडतो तसेच थोड्या उंचीवर पीक लागवड करण्यासाठी बेड आवश्यक असते.
या दोन्ही कामांसाठी जर हॅन्ड रिझर या यंत्राचा वापर केला तर फायद्याचे असते. दोन महिला देखील हे यंत्र चालू शकतात व याचा वापर उभा राहूनच करावा लागतो ज्यामुळे खाली वाकून काम करण्याची गरज नाही. महिलावर्ग देखील हे काम करू शकतात व त्यांची श्रमशक्तीचा होणारा अपव्यय टळतो.
4-पिकांच्या कापणीसाठी उपयोगी यंत्र - शेतामधील उभ्या पिकांचा कापण्यासाठी महिला शेतकरी इम प्रूड सिकल वापरू शकतात.
हे वजनाने फारच हलके असते त्यामुळे महिलांच्या शक्तीत बचत होते आणि कामाचा वेग देखील वाढतो. याची किंमत खूपच कमी आहे.
5- बियाण्यांची ग्रेडिंग आणि सफाईसाठी उपयोगी कृषी यंत्र- सोयाबीन, ज्वारी, बाजरी, हिरवे वाटाणे तसेच हरभरा इत्यादी मोठ्या आकाराच्या धान्य पिकांच्या ग्रेडिंग साठी आणि स्वच्छतेसाठी महिला शेतकरी स्पायरल सीड ग्रेंडरचा वापर करू शकतात.
या यंत्राची किंमत तीन हजार ते साडेसहा हजार रुपयांपर्यंत आहे. या यंत्राच्या वापरामुळे धान्यातील काडीकचरा सुलभतेने साफ करता येतो.
Published on: 31 July 2022, 03:06 IST