Farm Mechanization

शेतीची कामे ही यंत्राच्या साहाय्याने केली जातात. जमिनीच्या मशागतीचे कामे ही बैलांऐवजी ट्रॅक्टरने केली जात आहेत. नांगरणी असो, पेरणी, किंवा इतरी कामे यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. अनेक कंपन्यांनी आपले ट्रॅक्टर बाजारात आणले आहेत, याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

Updated on 23 February, 2022 5:19 PM IST

शेतीची कामे ही यंत्राच्या साहाय्याने केली जातात. जमिनीच्या मशागतीचे कामे ही बैलांऐवजी ट्रॅक्टरने केली जात आहेत. नांगरणी असो, पेरणीकिंवा इतरी कामे यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. अनेक कंपन्यांनी आपले ट्रॅक्टर बाजारात आणले आहेतयाची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

Mahindra 575 DI

या प्रकारच्या टॅक्ट्ररमध्ये ४ सिलिंडर आणि ४५ हॉर्स पॉवरचे इंजिन असते. या ट्रॅक्टरमध्ये मॅन्यूअल आणि पॉवर स्टेअरिंग हे दोन्ही पर्याय असतात. वजनाची  क्षमता ही १६०० किलो असते. महिंद्रा  ५७५ डी आय (575 DI ) ची किंमत ५.७० ते ६.१० लाख असते.  महिंद्रा ट्रॅक्टरच्या या मॉडेलला मॅन्यूअल आणि पॉवर स्टेअरिग देण्यात आली आहे. शक्तीशाली इंजिन, हाय रेटेड आरपीएम, उच्चतम वचन उचलण्याची क्षमता हे या ट्रॅक्टरचे वैशिष्ट्ये आहे.

Power Track Euro 50

या ट्रॅक्टरमध्ये ३ सिलिंडर ट्रॅक्टर आणि ५० हॉर्स पॉवरचे इंजिन असते. यात गिअर बॉक्स असून या ट्रॅक्टरची वजन उचलण्याची क्षमता ही दोन हजार किलो आहे. या टॅक्टरची किंमतही ६.१५ लाख ते ६.५० लाख रुपयांच्या दरम्यान असते. अधिक कार्यक्षमतेसाठी या ट्रॅक्टरमध्ये ड्र टाईप एअर फ्लिटर देण्यात आले आहे. यामुळे इंजिनला धुळविरहित हवा पुरवली जाते. यासह इंजिनने अधिक वेळ कार्यक्षम राहावे यासाठी वॉटर किलिग सिस्टिम देण्यात आले आहे.

पॉवर इरो ५० या ट्रॅक्टरला डिजिटल मीटर देण्यात आले आहे. यासह ऑपरेटरच्या सोयीसाठी स्लाइडिंग सीट आणि बॉटल होल्डर देण्यात आले आहे. ड्युअल क्लच, मल्टी स्पीड पीटीओ आणि सेफ्टी न्यूट्रल स्विच की देण्यात आली आहे. यासह या ट्रॅक्टरची इंधन क्षमता ही ६० लिटरची आहे.  Powertrac Euro 50 ट्रॅक्टरला ८ फॉरवर्ड गिअर आहेत, आणि दोन मागचे गिअर देण्यात आले आहे. ड्युल क्लच पर्यायामुळे हे टॅक्टर शेतीच्या कामासाठी खूप उपयोगी आहे.

John DEERE 5050 D

या ट्रॅक्टरमध्ये ३ सिलिंडर आणि ५० हॉर्स पॉवर देण्यात आले आहे. याचे इंजिन हे २९०० सीसी आहे. या ट्रॅक्टरलाही पॉवरही स्टेअरिंग आहे, तर वजन उचलण्याची क्षमता ही १६०० किलोची आहे. या ट्रॅक्टरची किंमत ही ६.९० ते ७.४० लाख रुपयांपर्यंत आहे. या ट्रॅक्टरला इंजिन बॅकअप उच्च प्रतीचा देण्यात आला आहे. यामुळे रस्ताची कशीही परिस्थिती असली तरी वारंवार गिअर बदलण्याची गरज नाही. गिअर सिलेक्शनने  इआरपीएमसह हे ट्रॅक्टर कमी गतीमध्येही चालण्यास सक्षम आहे.या ट्रॅक्टरची लोकप्रियता अधिक आहे. या ट्रॅक्टरला ३ सिलिंडर आणि ४८ हॉर्स पॉवर देण्यात आले आहे. १५०० किलो पर्यंतची वजन हे ट्रॅक्टर पेलू शकते. या ट्रॅक्टरची किंमत ६.२० पासून ते ६.५० लाख पर्यंत आहे. या ट्रॅक्टरला पॉवर स्टेअरिंग देण्यात आली आहे. स्वराज ७४४ ट्रॅक्टर बाह्य घटक असलेल्या हायड्रॉलिक साधनांसोबतही चांगले काम करते. या ट्रॅक्टरच्या देखभालीचा खर्च हा कमी आहे. इंधन क्षमता अधिक आहे.

New Holland 3600-2 TX

या ट्रॅक्टरमध्ये ३ सिलिंडर आणि ५० हॉर्स पॉवर आहे. यात डबल क्लच देण्यात आली आहे. या ट्रॅक्टरची गती ही प्रतितास ३४.५ किमी आहे. या ट्रॅक्टरची किंमत ही ६.४० ते ६.७० लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

Eicher tractor 557

हे ट्रॅक्टरमध्ये तीन सिलिंडर आणि ५० हॉर्स पॉवर आहे. यात ३३०० सीसीचे सिलिंडर देण्यात आली आहे. यामुले शेतीचे कामे व्यवस्थितपणे करता येतात. या ट्रॅक्टरला पॉवर स्टेअरिंग देण्यात आली असून वजन पेलण्याची क्षमता ही १४७० ते १८५० किलोपर्यंतची आहे. या ट्रॅक्टरची किंमतही ६.३५ लाखापासून ते ६.७० लाखापर्यंत आहे.

English Summary: this is six tractors is most useful for famer for farm work like as ploughing
Published on: 23 February 2022, 05:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)