Farm Mechanization

बरे शेतकऱ्यांची मागणी असते की त्यांना टॉप ट्रॅक्टर पाहिजे परंतु ते परवडणाऱ्या किमतीत. अशा शेतकऱ्यांसाठी या लेखात भारतातील काही टॉप 5 ट्रॅक्टरची यादी, त्यांची वैशिष्ट्ये, डिटेल्स माहिती आणि किंमत जाणून घेणार आहोत.

Updated on 23 May, 2022 1:16 PM IST

 बरे शेतकऱ्यांची मागणी असते की त्यांना टॉप ट्रॅक्टर पाहिजे परंतु ते परवडणाऱ्या किमतीत. अशा शेतकऱ्यांसाठी या लेखात भारतातील काही टॉप 5  ट्रॅक्टरची यादी, त्यांची वैशिष्ट्ये, डिटेल्स माहिती आणि किंमत जाणून घेणार आहोत.

त्यामुळे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार आणि आर्थिक बजेट नुसार ट्रॅक्टर ची निवड करण्यास मदत होईल.

 भारतातील टॉप 5 ट्रॅक्टर्स

1- फार्मट्रेक 60 क्लासिक ईपीआय टी20-आपल्याला माहित आहेच कि महिंद्रा ही भारतातील 2021 मधील सगळ्यात एक नंबर कंपनी आहे. परंतु यामध्ये फार्मट्रेक सुद्धा भारतीय कंपनी एस्कॉर्ट च्या पुढे असलेली एक शक्तिशाली ट्रॅक्टर कंपन्यांमधील एक कंपनी आहे.

फार्मट्रेक 60 क्लासिक ईपीआय टी 20 हे 50 एचपी हॉर्स पावर असलेले ट्रॅक्टर असून 60 लिटर फिऊल टँक क्षमता आहे.तीन सिलेंडर असलेले शक्तिशाली इंजन प्रदान करते.या वैशिष्ट्यांमुळे हे ट्रॅक्टर50 एचपी ट्रॅक्टर पैकी सगळ्यातचांगले ट्रॅक्टर आहे.

    या ट्रॅक्टरची किंमत

 हे ट्रॅक्टर ची किंमत सात लाख ते सात लाख 25 हजार रुपयांपर्यंत आहे.

2- सोनालिका 745 डीआय lll सिकंदर- सोनालिका भारतातील शेतकऱ्यांसाठी सगळ्यात विश्वास संपादन केलेल्या ब्रँड मधील एक ब्रँड आहे. हे कंपनीतिच्या कुशल ट्रॅक्टर निर्माणासाठी ओळखली जाते.

हे ट्रॅक्टर 50 एचपी हॉर्स पावर क्षमता असलेले तसेच आरामदायक, शक्तिशाली इंजिन तसेच हायड्रॉलिक्स आणि एक चांगले इंधन क्षमता व सोप्या ट्रान्समिशन सोबत येते. ज्यामुळे ते जास्त वेळ पर्यंत काम करणेदेखील आरामदायक बनवते.

  या ट्रॅक्टरची किंमत

 सोनालिका 745 डीआय lll ची किंमत पाच लाख 70 हजार ते सहा लाख तीस हजार रुपयांपर्यंत आहे.

3- न्यू हॉलांड 3630 TX प्लस- जेव्हापासून हे ट्रॅक्टर लॉन्च झाली तेव्हापासून शेतकऱ्यांच्या हृदयामध्ये एक विशेष स्थान प्राप्त केले आहे. हे ट्रॅक्टर तीन सिलेंडर इंजिन सोबत येते व 55 एचपी ची शक्तीअसलेले हे ट्रॅक्टर आहे. 1700 ते 2000 किलोपर्यंत वैकल्पिक हायड्रोलिक क्षमता याला अधिक ताकत वान बनवते.  तसेच स्वतंत्र क्लच लिव्हर सोबत डबल क्लच सारख्या वेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्ये देखील यामध्ये आहेत.

   न्यू हॉलांड 3630 TX प्लस ची किंमत

 या ट्रॅक्टर ची किंमत सात लाख दहा हजार ते सात लाख 60 हजार रुपयांपर्यंत आहे.

4- पावरट्रेक युरो 50 नेक्स्ट- पावर ट्रेक हा एक अजून ब्रांड महत्त्वपूर्ण असून भारतीय शेतकऱ्यांसाठी  खूप महत्त्वाचा मानला जातो. जेव्हा या ट्रॅक्टरच्या युरो सिरीज बद्दल  बोलले जाते तेव्हा पावरट्रेक युरो 50 नेक्स्ट शेतकऱ्यांसाठी अधिक पसंतीचे आणि विश्‍वास संपादन केलेले ट्रॅक्टर यांपैकी एक आहे. हे 52 एचपी ट्रॅक्टर असून यामध्ये तीन सिलेंडर इंजिन आणि दोन हजार किलो चा हायड्रोलिक क्षमता यामध्ये आहे.

    या ट्रॅक्टरची किंमत

हे ट्रॅक्टर सहा लाख 65 हजार ते सात लाख 35 हजार रुपयांपर्यंत मिळतो.

5- कुबोटा MU5501- कुबोटा ही जपानची कंपनी असून उन्नत सुविधा आणि उच्च तंत्रज्ञान युक्‍त ट्रॅक्टर साठी ओळखले जाते. कोणत्याही प्रकारच्या परिसरात आणि वातावरणात ही एकदम मजबूतपणे आणि सुलभतेने काम करते.

कुबोटा  MU5501 हे ट्रॅक्टर अतिशय शक्तिशाली आणि आधुनिक अशा ई- सीडीआयएस इंजिन सोबत येते व 55 एचपीक्षमता असलेले ट्रॅक्टर आहे.

 कुबोटा MU5501 ट्रॅक्टर ची किंमत

 या ट्रॅक्टर ची किंमत आठ लाख 60 हजार रुपये आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ शेतकरी मालामाल ,काय आहे टोमॅटो दरवाढी मागे कारण, जाणून घ्या

नक्की वाचा:ऊस, कांदा उत्पादकांच्या व्यथांचा भोंगा कोण वाजवणार! तुम्हाला फक्त मतदानाला विचारणार

नक्की वाचा:खाजगी डेअरीचालकांचा मनमानी कारभार; केली दूध खरेदीदरात मोठी घट

English Summary: this five tractor brands more useful and benificial for hard farming work
Published on: 23 May 2022, 01:16 IST