जर आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला तर शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. देशाच्या जीडीपीच्या वाढीमध्ये कृषी क्षेत्राचे फार मोठे योगदान आहे. भारतासारख्या कोट्यावधी लोकसंख्या असलेल्या देशात बुक भागवण्याचे महत्त्वाचे काम कृषी क्षेत्र करत असते. त्यामुळे चांगले उत्पन्न मिळावे, भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी नाविन्यपूर्ण लागवड याची माहिती मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात
उत्पन्न अधिक मिळावे यासाठी शेतकरी भौगोलिक तसेच हवामान संबंधी माहिती घेण्यासइच्छुक असतात. या पार्श्वभूमीवर शेतात डिजिटल पद्धतीचा अवलंब करण्यात येत असून अलिकडच्या काळात डिजिटल पद्धतीला वेग आला आहे. या वेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक सोपी, फायदेशीर, कार्यक्षम आणि अधिक सुरक्षित बनत आहे.या लेखात आपण शेती क्षेत्राशी संबंधित काही तंत्रज्ञानाची माहिती घेऊन यामुळे शेतकऱ्यांना फार फायदा होणार आहे.
शेती क्षेत्रातील महत्वाचे तंत्रज्ञान
- जीआयएस सॉफ्टवेअर आणि जीपीएस शेती- शेतीतील अचुकते साठी हे सॉफ्टवेअर फार फायदेशीर आहे. जे लोक पर्जन्यमान,तापमान, एक पन्ना व वनस्पतींचे आरोग्य विषयी माहिती जाणून घेण्यासाठी हे फार फायदेशीर आहे.
- Satellite Imagery( सॅटॅलाइट इमेजरी )- ये उपग्रहाने ड्रोन द्वारे फोटो किंवा मौल्यवान डेटा संग्रह केला जातो. हा डेटा वनस्पती,मातीची स्थिती, हवामान विषयक अचूक अंदाज या माध्यमातून घेता येतो. या तंत्रज्ञानाद्वारे पिकाच्या उत्पन्नाचा अंदाज सहजपणे घेता येतो. पिकाशी निगडीत विविध प्रकारचे धोक्याचे कारणे शोधण्याचे उद्दिष्ट ठेवून रिअल टाईम शेतात देखरेख देखील करता येते.पिकां वर या उपग्रहाच्या साह्याने नजर ठेवता येते. याच्यातून आपल्या पुढील धोक्याविषयी माहिती मिळते आणि शेतातील पिकांवर कोणत्या प्रकारचे रोग आले आहेत याची माहिती मिळते.
- ड्रोन/ एरियल इमेजरी(Drone/Arieal Imagery)- या तंत्रज्ञानात ड्रोन च्या सहाय्याने शेतांचे फोटो घेतले जातात. पिकांचे बायोमास, पिकांची उंची, शेतातील पिकासाठी तन उपस्थिती सह पाण्याची संपृक्ततायाची अचूक ते विषयी शेतकऱ्यांना अंदाज मिळत असतो. ड्रोन मार्फत घेण्यात आलेले फोटो हे उपग्रहाने घेतलेले फोटो पेक्षा अधिक फायदेशीर असतात.
- ड्रोनच्या माध्यमातून मिळालेली माहिती ही फायदेशीर असते. शिवाय अळ्यांचा, कीटकांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर ड्रॉनच्या मदतीने फवारणी केली जाते. यामुळे अखेरीस रासायनिक नियंत्रण पद्धती लागू होण्याची शक्यता कमी होते.त्यामुळे पिकाच्या वाढीवर किंवा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो.
- शेती सॉफ्टवेअर आणि ऑनलाइन डाटा-हे शेतीवर आधारित सॉफ्टवेअर आहे. ज्यामुळे उपग्रह प्रतिमा मधून प्राप्त पिकांच्या स्थिती वरील डेटा सहहवामानाचा डेटा चे विश्लेषण केले जाऊ शकते.याच्या मदतीने शेतकरी अचूक पणे सिंचन लागू करू शकतात.दव किंवा उष्णतेचे नुकसान रोखू शकतात.
- मार्जिन डेटासेट्स(Margin Detasets)- पिकांच्या देखरेखीसाठी वापरली जाते. आपली शेती कशी आहे याची माहिती घेण्यासाठी याचा उपयोग केला जातो. जिल्ह्यातील इतर शेतांच्या तुलनेत आपले शेत कसे आहे याची माहिती साठी हे तंत्रज्ञान उपयोगाचा आहे.हवामान संदर्भात माहिती देण्यासाठीही याचा उपयोग होतो.
Published on: 11 December 2021, 12:26 IST