Farm Mechanization

आजकाल तंत्रज्ञानात झालेल्या बदलांमुळे शेतीसाठी नवनवीन आधुनिक उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. या आधुनिक व दरर्जेदार उपकरणांमुळे शेती करणे अधिक सुलभ झाले आहे. या उपकरणांमध्ये सर्वात जास्त मागणी ट्रॅक्टरची असते .तसेच फळबागा, फळभाज्यांच्या बागा किंवा आधुनिक शेती करणाऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टर अधिक उपयुक्त असतात. म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून त्यांची मागणी सातत्याने वाढत आहे.

Updated on 01 November, 2023 6:25 PM IST

आजकाल तंत्रज्ञानात झालेल्या बदलांमुळे शेतीसाठी नवनवीन आधुनिक उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. या आधुनिक व दरर्जेदार उपकरणांमुळे शेती करणे अधिक सुलभ झाले आहे. या उपकरणांमध्ये सर्वात जास्त मागणी ट्रॅक्टरची असते .तसेच फळबागा, फळभाज्यांच्या बागा किंवा आधुनिक शेती करणाऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टर अधिक उपयुक्त असतात. म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून त्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. तुम्हालाही मजबूत पण छोटा ट्रॅक्टर घ्यायचा असेल, तर बाजारात अनेक मिनी ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. मिनी ट्रॅक्टर 20 ते 30HP पर्यंत असते. मिनी ट्रॅक्टर आकाराने छोटे असले तरी मजबूत इंजिन आणि उत्कृष्ट RMP मुळे ते शेतीची सर्व कामे करू शकतात. आज आपण काही अशाच आधुनिक व दरर्जेदार मिनी ट्रॅक्टर बद्दल जाणून घेणार आहोत.

मॅसी फर्ग्युसन 30 डीआय ऑर्चर्ड प्लस -
या ट्रॅक्टरमध्ये 30 एचपी पॉवर आहे. यात 2 सिलेंडर्ससह 1670 cc इंजिन आहे जे 1000 RPM आणि 1500 ERPM जनरेट करते. यात सिंगल क्लच सिस्टीम आहे जे ऑपरेट करणे सोपे करते, त्यासोबत मॅन्युअल स्टीयरिंग, एक्सपांडेबल मेकॅनिकल ब्रेक आहे. या ट्रॅक्टरची हायड्रॉलिक क्षमता 1100 किलो आहे. या ट्रॅक्टरच्या सहाय्याने कल्टीव्हेटर, रोटाव्हेटर आणि प्लँटर आणि इतर उपकरणे सहज करता येतात.
बागायतीशिवाय गहू, भात आणि ऊस लागवडीसाठीही या ट्रॅक्टरचा वापर करता येतो. ट्रॅक्टरमध्ये टूल्स, हुक, टॉप लिंक, कॅनोपी, ड्रॉवर हिच आणि बंपर यांसारखे अटॅचमेंट देखील उपलब्ध असतील. किमतीबद्दल बोलायचे तर हा ट्रॅक्टर 5.40 लाख रुपयांना खरेदी करता येईल.

MF 6026 MaxPro -
26 HP क्षमतेचा हा मॅसीचा सर्वात लहान पण शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरमध्ये 1318 cc चे 3 सिलेंडर इंजिन आहे. यात 9 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स गीअर्ससह सिंगल क्लच आणि गियर बॉक्स आहे. यात पॉवर स्टीयरिंग आणि मल्टी डिस्क ऑइल इमर्स्ड ब्रेक्स आहेत. 3 पॉइंट लिंकेज आणि कंट्रोल, ड्राफ्ट आणि ऑटो सेन्स पोझिशन आणि रिस्पॉन्स ही या ट्रॅक्टरची वैशिष्ट्य आहे.

MF 5225-
हा मिनी ट्रॅक्टर 24 HP चा आहे. यात 1290 cc चे 2 सिलेंडर इंजिन आहे. यात 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गीअर्ससह सिंगल क्लच आणि गियर बॉक्स आहे. यात मॅन्युअल स्टीयरिंग आणि मल्टी डिस्क ऑइल इमर्स्ड ब्रेक्स आहेत. त्याचबरोबर या ट्रॅक्टरमध्ये 3 पॉइंट लिंकेज आहेत.याची हायड्रॉलिक उचलण्याची क्षमता 750 किलो आहे.

English Summary: These are mini tractors that perform quality work in agriculture
Published on: 01 November 2023, 06:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)