लेझर लँड लेव्हलर हे यंत्र शेतकऱ्यांसाठी फारच उपयुक्त आहे. विशेषत ज्या शेतकऱ्यांची शेती पूर्ण रूपाने समतल किंवा सपाट नाही अशांसाठी हे यंत्र उपयुक्त आहे. जमीन सपाट नसल्याकारणाने बऱ्याच शेतकऱ्यांना लागवड करताना, पिकांना खते किंवा पाणी देताना बर्याच प्रकारच्या समस्या उद्भवतात.
अशा उतार-चढाव असलेल्या शेताला शेती करणे युक्त बनवण्यासाठी लेझर लँड लेव्हलर मशीनचा उपयोग होतो. या यंत्राच्या सहाय्याने जमिनीचे सपाटीकरण करणे सोपे होते, त्यामुळे पिकांना पाणी देताना सारखे रुपात देता येणे शक्य होते. त्यामुळे पाण्याची बचतही होते, तसेच खते आणि इंधनाची पण बचत होते. आपल्या भारताचा विचार केला तर भौगोलिक परिस्थिती सगळीकडे सारखे नाही. बऱ्याच ठिकाणी जमीनही उंचवट्याच्या आहे. अशा जमिनीत पिकांची लागवड करणे फार कठीण काम असते. कारण शेती करण्यासाठी जमीन सपाट असून फार आवश्यक असतं. उत्तर चढ असलेल्या किंवा उंचवटा असलेल्या जमिनीमध्ये लागवड करायचे ठरले तर बियाणे हे सगळ्या ठिकाणी सारख्या प्रमाणात लावले जात नाही. त्यामुळे बियाण्याची उगवण सारख्या प्रमाणात होत नाही. त्याचा परिणाम सरळ उत्पादनावर होतो. या सगळ्या समस्यांना लक्षात घेऊन लेझर लेव्हलर या यंत्राची निर्मिती केली गेली आहे.
या मशिनच्या सहाय्याने उंच असलेल्या जागेवरची माती खाली ओढून खालच्या जागेकडे नेऊन सर्व क्षेत्र सपाट किंवा समतल बनवले जाते. त्यामुळे मातीची उत्पादन क्षमताही वाढते.
काय आहे लेझर लँड लेव्हलर मशीन?
हे यंत्र एक विशेष प्रकारचे कृषी यंत्र आहे. या मशिनची निर्मिती ही परंपरागत पद्धतीन पेक्षा एकदम वेगळी अशा आधुनिक तंत्रज्ञानाने केलेली आहे. या यंत्राला ट्रॅक्टरच्या साहाय्याने जोडून चालवले जाते. या यंत्राचे महत्त्वाचे कार्य म्हणजे जमिनीचे सपाटीकरण करणे हे होय. या यंत्राच्या साहाय्याने निर्माण स्थळ, रस्ते आणि ड्रेनेज सिस्टमचे सुद्धा सपाटीकरण केले जाऊ शकते.
लेझर लँड लेव्हलर मशीनची डिझाईन
लेझर लँड लेव्हलर, लेझर ट्रान्समीटर, लेझर रिसिवर, विद्युत नियंत्रण पॅनेल, हायड्रोलिक नियंत्रण वाल्व, जमीन सपाटीकरण यासाठी लागणारे आवश्यक बकेट इत्यादी भागांनी मिळून यंत्राची निर्मिती केली गेली आहे.
यंत्राचे फायदे
-
या यंत्राद्वारा जमीन सपाटीकरण करण्यामुळे पाण्याचा अधिक उपयोग होतो म्हणजे पाणी वाया जात नाही. जवळजवळ 40 टक्के पाण्याची बचत होते.
-
भाताची पेरणी करत असताना आदिवास्याचा तयार करत असताना सपाटी करण्यासाठी उपयुक्त असे यंत्र आहे.
-
पूर्ण शेतामध्ये पाण्याच्या समान वितरण व्यवस्था योग्यप्रकारे केली जाऊ शकते.
-
जल संसाधनांचा सुलभतेने कुशल उपयोग केला जाऊ शकतो.
-
जमिनी सगळ्या बाजूने सपाट आणि सारख्या आकारात झाल्याने पीक लागवडीचे काम सुलभतेने आणि जलद गतीने करता येते.
-
सपाट असलेल्या जमिनीमध्ये बियाण्याची लागवड व्यवस्थित पद्धतीने झाल्याने उगवण चांगली होते. त्यामुळे येणारे उत्पादनही चांगले येते.
-
वेगळ्या प्रकारची पोषणतत्वे, रासायनिक खते एकसमान पद्धतीने आणि व्यवस्थित देता येतात.
लेझर लँड लेव्हलर मशीनची किंमत आणि सबसिडी
वेगवेगळ्या राज्यानुसार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारद्वारा सबसिडी दिली जाते. सबसिडीचा दर हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळा असू शकतो. सर्वसाधारणपणे लघु/ सीमांत आणि महिला शेतकऱ्यांसाठी पन्नास टक्क्यांपर्यंत आणि मोठ्या शेतकऱ्यांसाठी 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जाते. या यंत्राची साधारणपणे किंमत आहे अंदाजे तीन लाख पन्नास हजार पर्यंत आहे. प्रतिष्ठित कंपनीच्या लेझर लँड लेव्हलर मशीनची किंमत यापेक्षा जास्त असू शकते.
लेझर लँड लेव्हलर यंत्राच्या निर्माण करणाऱ्या कंपन्या
-
दशमेश
-
जॉन डियर
-
फिल्ड किंग
-
के एस ग्रुप
-
सोईल मास्टर
-
लँड फोर्स
-
महिंद्रा, या कंपन्या प्रामुख्याने लेझर लँड लेव्हलर यंत्राची निर्मिती करतात.
Published on: 22 April 2021, 06:28 IST